AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची कार च करेल, तुमचे ‘उन्हा’ पासून संरक्षण … तुमच्या बजेटमध्ये, मारूतीपासून होंडापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध !

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या कार खूप उपयुक्त आहेत, किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे मारुतीपासून होंडा पर्यंतच्या कार सेकंड हँड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. या गाड्यांची स्थिती चांगली दिसत असली तरी, तुम्ही एकदा प्रत्यक्ष कार तपासूनच खरेदी करा.

तुमची कार च करेल, तुमचे ‘उन्हा’ पासून संरक्षण ... तुमच्या बजेटमध्ये, मारूतीपासून होंडापर्यंतचे अनेक पर्याय उपलब्ध !
प्रतिनिधीक फोटो Image Credit source: tv9
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: May 02, 2022 | 5:26 PM
Share

यंदा प्रचंड तापमान वाढ सुरू असून, मे महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानाने, 45 चा पारा गाठला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला उन्हापासून संरक्षणाचे (Protection from the sun) मार्ग शोधावे लागत आहेत. प्रचंड उन्हातही तुम्ही स्वत:ला किंवा तुमच्या कुटुंबाला बाईक किंवा स्कूटरने घेऊन जात असाल, तर तुम्हाला उष्माघात किंवा कडक उन्हामुळे उद्भवणाऱया समस्यांचा सामना करावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही सेंकड हॅण्ड कार (Second hand car) खरेदीचा पर्याय वापरू शकता. तर आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. नवीन गाड्यांच्या तुलनेत या गाड्यांची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा कमी (Price less than Rs 3 lakh) आहे. या गाड्यांचे तपशील पाहण्यासाठी तुम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही मोबाईलवर घरी बसून किंवा ऑफिसमध्ये राहून कारची माहिती मिळवू शकता.

3 लाखा खालील मारूती कार

जर तुम्ही 3 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीची मारुती कार घेण्याचा विचार करत असाल तर Cars24 वर मारुती ए स्टार कार उपलब्ध आहे. ही ABS सह येते आणि वन हॅण्ड कंडिशन असलेली कार आहे. या सेकंड हँड कारची किंमत 2,72,799 रुपये आहे. दिल्लीतील आरटीओमध्ये नोंदणीकृत ही कार पेट्रोलवर चालते आणि फस्र्ट ऑनर कार आहे. एवढेच नाही तर ही एक ऑटोमॅटिक कार आहे, ज्यामुळे युजर्संना बाहेरील गीअर्स बदलण्याची चिंता करावी लागणार नाही. या कारची नोंदणी ऑगस्ट 2013 मध्ये झाली होती.

वॅगन आर सेकंड हँड कार

सेंकड हँड कारमध्ये वॅगनआर कारचाही समावेश आहे. ही मारुती वॅगन आर 1.0LXI मॅन्युअल कार 48 हजार किलोमीटर पर्यंत अंतर पार केलेली कार आहे आणि दिल्लीमध्ये नोंदणीकृत आहे. ही पेट्रोलवर चालणारी कार 2010 ची मॉडेल असून ती सेंकड ऑनर कार आहे. त्याचा विमा मे 2023 पर्यंत वैध आहे. या कारची किंमत 2.44 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

सेकंड हँड होंडा ब्रिओ

तुम्ही होंडा कार घेण्याचा विचार करत असाल, तर ही होंडा कार फक्त 2,50,000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही कार 2012 मॉडेल असून दिल्लीत नोंदणीकृत आहे. कार देखो नावाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ही कार केवळ 33 हजार किलोमीटर धावली आहे. यात 1198 cc चे इंजिन असून ते मॅन्युअल ट्रान्समिशनवर काम करते. ही कार पेट्रोल इंधनावर मॅन्युअल चालणारी आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा