
Zero Down Payment Car Loan : जर तुम्ही नवीन कार खरेदी करायचा विचार करत असाल तर अगोदर डाऊन पेमेंटची तजवीज करावी लागते. पण अनेकदा कार खरेदीसाठी कर्जाची सोय होते. पण डाऊन पेमेंटची रक्कम जुळवता जुळवता नाकीनऊ येतात. पण आता डाऊन पेमेंटची ही झंझट संपणार आहे. तुमच्यासमोर हा एक चांगला पर्याय आहे. त्याआधारे तुम्ही विना आगाऊ रक्कम भरता कार शो-रूममधून घरी आणू शकता. देशातील अनेक ऑटो कंपन्या आणि बँका झिरो डाऊन पेमेंटची सुविधा देतात. त्यामुळे विना डाऊन पेमेंट तुम्हाला कार घरी आणता येते आणि चारचाकीचे स्वप्न साकारता येते.
काय आहे झिरो डाऊन पेमेंट?
झिरो डाऊन पेमेंट स्कीमतंर्गत ग्राहकांना कारच्या खरेदीसाठी कोणतीच मोठी रक्कम शो-रूम अथवा डीलरला देण्याची गरज पडत नाही. बँका अथवा फायनान्स कंपन्या कारची संपूर्ण ऑन-रोड किंमत फायनान्स करता. त्यामुळे ग्राहकांना केवळ EMI वेळेवर न चुकता भरण्याची जबाबदारी असते.
EMI वाढतो
झिरो डाऊन पेमेंटच्या सुविधेमुळे ईएमआय, कारचा हप्ता मात्र वाढतो. त्यासाठी दरमहा जादा रक्कम मोजावी लागते. पण तुम्हाला कार खरेदी करतेवेळी एक रुपयाही डाऊन पेमेंट करावे लागत नाही. ही योजना त्या कार प्रेमींसाठी फायद्याची आहे, ज्यांना त्यांची बचत डाऊन पेमेंटवर खर्च करावी वाटत नाही.
अनेक बड्या बँका आणि वित्त पुरवठा संस्था अशी सुविधा देतात. त्यात एसबीआय, एचडीएफसी, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स सारख्या कंपन्या झिरो डाऊन पेमेंट कार कर्ज सुविधा देतात. अर्थात सर्वच कार खरेदीदार या योजनेसाठी पात्र असतील असे नाही. या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी कागदपत्रं पण कमी लागतात.
जर तुम्हाला 60 हजार रुपयांचा टीव्ही खरेदी करायचा असेल तर त्यावर कमीत कमी 10 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट द्यावे लागते. पण तुम्ही जेव्हा झिरो डाऊन पेमेंटचा पर्याय निवडता. तेव्हा तुम्हाला विना एक रुपया खर्च करता शून्य डाऊन पेमेंटवर टीव्ही देण्यात येतो. तसाच हा प्रकार आहे.