AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार मानतो- बृजभूषण सिंह

बृजभूषण सिंह हे सध्या अयोध्या आणि राम जन्मभूमीबाबत वारंवार बोलताना दिसत आहेत."मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार मानतो", असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत.

मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार मानतो- बृजभूषण सिंह
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 26, 2022 | 7:32 PM
Share

मुंबई : सध्या अयोध्येचा (Ayodhya) मुद्दा चर्चेत आहे. यावरच उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी अयोध्येवर भाष्य केलंय. मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार मानतो, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. ते आज अयोध्येत बोलत होते. याचसोबत त्यांनी अयोध्येच्या इतिहासाचे दाखले देत अनेक बाबी लोकांसमोर मांडल्या. तसंच आज त्यांनी राज ठाकरेंवरदेखील जोरदार चर्चा केली आहे. त्यांनी टीव्ही 9 सोबत बातचित करताना राज ठाकरेंना एका वाक्यात आव्हान दिलं आहे. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही.”

बृजभूषण सिंह म्हणतात…

बृजभूषण सिंह हे सध्या अयोध्या आणि राम जन्मभूमीबाबत वारंवार बोलताना दिसत आहेत.”मी स्वत:ला अयोध्येचा चौकीदार मानतो”, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. ते आज अयोध्येत बोलत होते. याचसोबत त्यांनी अयोध्येच्या इतिहासाचे दाखले देत अनेक बाबी लोकांसमोर मांडल्या.

बृजभूषण सिंह यांच्याकडून राज ठाकरेंवर टीका

बृजभूषण सिंह यांनी आज कठोर शब्दात राज ठाकरेंवर टीका केली आहे. टीव्ही 9 मराठीसोबत बातचित करताना त्यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलंय. त्यांना विचारण्यात आलं की राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत काय सांगाल त्यावर ते म्हणाले की, “राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही.”

“बिहारचा बक्सर हा असा भाग आहे, जिथे भगवान रामने शिक्षा ग्रहण केली होती. विश्वमित्रने लंका अभियानाची योजना इथूनच तयार केली. त्याच धरतीवरून आम्ही अयोध्या आंदोलनासाठी समर्थन मागायला आलोय”, असंही बृजभूषण सिंह म्हणाले.

काही दिवसांआधी बृजभूषण सिंह यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. यात त्यांनी “पक्षाच्या सांगण्यावरूनच मी राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत आहे”, असं म्हटलं होतं.बृजभूषण सिंह यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपची चांगलीच कोंडी झाली. राज ठाकरेंविरोधातील ट्रॅप भाजपचाच असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा