कर्क धनु आणि मकर राशींच्या लोकांना भारी पडू शकतो निष्काळजीपणा, जाणून घ्या इतर राशींची माहिती

महेश घोलप, Tv9 मराठी

Updated on: Apr 28, 2022 | 10:27 AM

वृश्चिक राशीच्या लोकांचे मन आज प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, प्रवासाचा आनंद घ्याल. व्यवसायात चांगला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली सुरुवात करणार आहे.

कर्क धनु आणि मकर राशींच्या लोकांना भारी पडू शकतो निष्काळजीपणा, जाणून घ्या इतर राशींची माहिती
या राशीच्या लोकांनी कर्ज घेणे टाळावे
Image Credit source: tv9 marathi

मुंबई – आज 28 एप्रिल तारीख असून गुरूवार (Thursday) आहे. आजचा आपला दिवस कसा असेल, ते कोणते पर्याय आहेत. जे तुमचं आजचा दिवस एकदम खुशीत जाईल. इथं आम्ही तुम्हाला काही टिप्स (Tips) देणार आहोत. त्याचं पालन करून तुमचा आजचा दिवस तुम्ही आनंदी करू शकता. विशेष म्हणजे आजच्या राशीभविष्यमध्ये (In the horoscope) आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत. त्यामुळे तुमचं आज कोणतंही नुकसान होणार नाही.

 1. मेष
  मेष राशीच्या कुटुंबियांध्ये काही अन्य कारणावरून आणि मालमत्तेच्या कारणावरून गैरसमज चालू होते. आज ती गोष्ट कोणाच्यातरी मध्यस्थिती दुर होईल. त्यामुळे तुमच्या कुटुंबात शांती नांदेल. घरात चांगल्या शुभ गोष्टी होण्याचे संकेत आहेत. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीने सल्ला दिल्यास त्यावर वाद घालू नका. तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ लोकांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर राहील. कोणत्याही व्यक्तीशी बोलताना अभद्र भाषा बोलू नये. त्यामुळे तुमचे संबंध तुटण्याची शक्यता आहे.
 2. वृषभ
  वृषभ राशीच्या लोकांवरती त्यांच्या वडिलांसमान लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. त्याचा सल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनीचा फायदा देखील होण्याची शक्यता आहे. आळस करू नका, तुमची मेहनत कायम ठेवा, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता अधिक आहे.
 3. मिथुन
  व्यवस्थापकीय प्रयत्न अधिक तीव्र होतील. आर्थिक विषयात रुची वाढेल.योजना पूर्ण कराल. शासन प्रशासनाच्या कामात यश मिळेल. विविध खटले पक्षात होतील. सहज संवाद वाढेल. व्यावसायिक वाटाघाटी प्रभावी ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित कामे होतील. प्रस्तावांना पाठिंबा मिळेल. सेवा क्षेत्रात चांगले काम कराल. तुमचा संकल्प ठेवा. नात्यात फायदा होईल. सक्रियपणे काम करा. मोठा विचार करा. प्रभाव वाढत राहील.
 4. कर्क
  तुमचं कोणतं प्रकरण सध्या कोर्टात सुरू असेल, तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. दुपारनंतर अप्रत्यक्ष काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. कोणत्यातरी राजकीय व्यक्तीकडून तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे.
 5. सिंह
  सिंह राशीचे लोक आज उत्साहाने भरलेले दिसतील, नशीब तुमच्या सोबत आहे, कामात उत्साह राहील असे गणेश सांगतात. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल. कुटुंबाच्या वतीने तुम्ही निश्चिंत राहाल. आज नशीब तुमच्या सोबत आहे, तुम्ही शुभ कार्यात सहभागी व्हाल.
 6. कन्या
  कन्या राशीच्या लोकांना आज भाग्य साथ देईल असे गणेश सांगतात. यासोबतच आज ते लोक मांगलिक कार्यातही सहभागी होतील. तुमचे बोलणे मधुर असेल, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल. कार्यक्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या कामाच्या योजना पूर्ण कराल. कौटुंबिक सुख चांगले राहील. मनामध्ये आनंद राहील.
 7. तूळ
  तूळ राशीच्या लोकांनी आज आपल्या इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासनाशी संबंधित कामे सहज पूर्ण होतील. सध्याच्या परिस्थितीमुळे व्यावसायिक क्रियाकलाप कमकुवत राहतील. चांगल्या लोकांशी संबंध निर्माण होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल. तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा नक्कीच मिळेल, त्यामुळे धीर सोडू नका आणि समोरच्या आव्हानांना सामोरे जा. आज नशीब ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
 8. वृश्चिक
  वृश्चिक राशीच्या लोकांचे मन आज प्रसन्न राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल, प्रवासाचा आनंद घ्याल. व्यवसायात चांगला फायदा होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगली सुरुवात करणार आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कामात चांगले आर्थिक लाभ होतील. तुम्ही पैसेही वाचवू शकता.
 9. धनु
  धनु राशीच्या लोकांसाठी दिवसाचा पूर्वार्ध अधिक अनुकूल आणि आनंददायी असेल. कामात अनुकूल प्रगती होईल आणि कौटुंबिक आनंदासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज व्यापारी वर्गातील लोक चांगली कमाई करू शकतात, चांगला सौदा देखील होऊ शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात मोठा बदल होऊ शकतो. आज नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला न्यायालयीन खटल्यातून मुक्तता मिळेल. आज नशीब ९२ टक्के सोबत असेल. हनुमान चालिसा वाचन करावे.
 10. मकर
  मकर राशीच्या लोकांचे आरोग्य आज सुधारेल. तुमच्या घरी राहून बहुतांश कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिकांसाठी काळ कठीण असू शकतो. परंतु निराश होऊ नका. नोकरदार लोकांच्या कामाची अधिकारी प्रशंसा करतील. सासरच्यांकडून चांगली बातमी मिळेल. आज नोकरीत तुमची कामगिरी चांगली राहील. तुमच्याकडे बोलण्याची कला आहे जी तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात यशाच्या शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज तुमचे भाग्य 85 टक्के असेल. सूर्यदेवाला जल अर्पण करा.
 11. कुंभ
  कुंभ राशीच्या लोकांसाठी आज काम हळू हळू चालेल. व्यवसायात एकूण नफा मिळण्याची आशा आहे. व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक टाळावी. आज काही नवीन खरेदी कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज मन प्रसन्न राहील. आज ७९ टक्के नशीब तुमच्या सोबत आहे. भगवान विष्णूची पूजा करा.
 12. मीन
  मीन राशीच्या लोकांच्या बोलण्याने आज लोकांवर प्रभाव पडेल. व्यावसायिक जीवनातील परिस्थिती तुमच्या इच्छेनुसार असेल. तुमच्या व्यवसायातील काही काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होऊ शकतात. मित्रांना दिलेले वचन पूर्ण करणे सोपे जाईल. आज तुम्हाला शैक्षणिक आणि स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल.


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI