Somwar Upay: उत्पन्न आहे पण बरकत नाही? मग सोमवारी करा ‘हे’ विशेष उपाय

सोमवारच्या दिवशी केलेल्या काही उपायांमुळे आर्थिक चणचण होऊ शकते दूर. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

Somwar Upay: उत्पन्न आहे पण बरकत नाही? मग सोमवारी करा 'हे' विशेष उपाय
शिवलिंग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 7:25 PM

मुंबई,  हिंदू धर्मात, प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते. अनेक जण या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी उपवासही ठेवतात. असे मानले जाते की, सोमवारी व्रत (Somwar Vrat) केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. विशेषतः जे आर्थिक समस्येतून जात आहेत त्यांनी काही उपाय केल्यास यातून निश्चितपणे मार्ग निघतो.

आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपाय

जर तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता भासत असेल किंवा घरात पैसा टिकत नसेल तर सोमवारी शिवलिंगावर दुधात पाणी मिसळून अर्पण करावे. यासोबतच रुद्राक्षाच्या माळाने ‘ओम सोमेश्वराय नमः’ चा सुमारे 108 वेळा जप करा. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला दूधमिश्रित पाण्याने अर्घ्य अर्पण करावे. हा उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते.

कुंडलीतून ग्रह दोष दूर करण्यासाठी

जर तुमच्या कुंडलीत ग्रह दोष असेल तर सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. सलग 7 सोमवार हा उपाय केल्यास ग्रह दोष दूर होऊ शकतात. यासोबतच इच्छित फळही मिळते.

हे सुद्धा वाचा

काळे तीळ दान करा : आर्थिक लाभासाठी सोमवारी संध्याकाळी काळे तीळ आणि कच्चा तांदूळ एकत्र करून दान करावे. असे केल्याने पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. यासोबतच तुमच्या आयुष्यातील समस्याही दूर होतात.

जल अभिषेक करा:  आर्थिक चणचण, आरोग्याची समस्या, वैवाहिक जीवनातील समस्या तसेच दीर्घ आयुष्यासाठी दर  सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करावा. या सोबतच शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे. सोमवारच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार टाळावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही) 

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.