AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FD पेक्षाही चांगला परतावा देणाऱ्या योजना; बाजारात LIC चे 5 जबरदस्त प्लान, एकदा वाचाच

LIC Schemes : बाजारात FD पेक्षाही सुरक्षिता परतावा योजना बाजारात आहेत. LIC च्या या 5 योजनांची सर्वाधिक चर्चा होते.

FD पेक्षाही चांगला परतावा देणाऱ्या योजना; बाजारात LIC चे 5 जबरदस्त प्लान, एकदा वाचाच
| Updated on: Jul 06, 2026 | 5:56 PM
Share

तुमच्या आयुष्यातील कमाई सुरक्षितरित्या गुंतवायची असेल, तर LIC च्या अनेक योजना विश्वासार्ह आहेत. खुद्द सरकार प्रोत्साहन देणाऱ्या योजनांमध्ये दीर्घकालीन बचत आणि कर लाभ देखील मिळतात. शेअर बाजारात चढ-उतार असतानाही गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. खरंतर अनेक जण सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर एलआयसी योजनांना प्राधान्य देतात. त्यात 2026 साठीच्या 5 प्रमुख योजनांविषयी जाणून घेऊयात.

एलआयसी न्यू एंडोमेंट हा प्लान मुदत कालावधी पूर्ण झाल्यानंतर रक्कम काढणाऱ्यांसाठी चांगला आहे. या प्लानमध्ये बोनचा देखील लाभ मिळतो. वय वर्ष 35, मुदत कालावधी 25 वर्ष, 10 लाखांच्या रकमेकरिता वार्षिक प्रिमियम अंदाजे 39365 रुपये आहे. मुदत कालावधी झाल्यानंतर 22 लाख ते 25 लाखापर्यंत मिळू शकतात.

एलआयसी न्यू जीवन आनंद या प्लानमध्ये मुदत कालवधी पूर्ण झाल्यानंतरही जीवन विमा संरक्षण मिळते. या योजनेचा वार्षिक प्रिमियम अंदाजे 46,911 रुपये इतका आहे. मुदत कालावधी झाल्यानंतर अंदाजित रक्कम 22 लाख रुपये मिळू शकते.

मुलांच्या शिक्षण आणि आर्थिक उद्दिष्टासाठी गुंतवणुकीसाठी एलआयसी जीवन लक्ष्य हा चांगला प्लान आहे. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर भविष्यातील प्रिमियम माफ केले जाते. तसेच कुटुंबाला लाभ देखील मिळतात. एलआयसी जीवन लाभ या प्लानमध्ये मर्यादित वर्षांसाठी प्रिमियम भरावा लागतो. या योजनेच्या माध्यमातून परतावा चांगला मिळतो. अंदाजित परतावा दर सुमारे 7.1 टक्के इतका आहे.

सेवानिवृत्तीनंतर नियमित उत्तन्न मिळवण्यासाठी एलआयसी जीवन उमंग ही योजना चांगला पर्याय ठरू शकते. यात प्रिमियम भरण्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर वार्षिक उत्पन्न मिळते. योजनेमार्फत 100 वर्षांपर्यंत विमा संरक्षण मिळते. इतर योजनांच्या तुलनेत परतावा कमी आहे.

तत्पूर्वी, कोणत्याही एलआयसी योजनेत गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आर्थिक उद्दिष्टे, प्रिमियम भरण्याची क्षमता आणि संभाव्य परतव्याविषयी अभ्यास करावा. तसेच योजनेच्या इतर बाबींचाही अभ्यास करावा. त्याचबरोबर योजनेची पात्रता, रायडर्स, कर लाभ, मुदत कालावधीच्या अटी, इतर नियमांचेही काळजीपूर्वक वाचन करावे. एखादा निर्णय घेण्याआधी सल्लागाराचा सल्ला घेणे अधिक उत्तम ठरेल. .

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन