AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G20 च्या आधी जागतिक बँकेकडून भारताचे कौतुक, 50 वर्षाचे काम फक्त 6 महिन्यात

जागतिक बँकेने G20 बैठकीपूर्वी एका दस्तऐवजाद्वारे भारताचे भरभरून कौतुक केले आहे. जागतिक बँकेने भारताच्या UPI, जन धन, आधार, ONDC आणि Cowin सारख्या गोष्टींची प्रशंसा केली आहे.

G20 च्या आधी जागतिक बँकेकडून भारताचे कौतुक, 50 वर्षाचे काम फक्त 6 महिन्यात
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 08, 2023 | 7:41 PM
Share

मुंबई : G20 च्या आधी जागतिक बँकेने भारताचे कौतुक केले आहे. G20 च्या आधी तयार केलेल्या दस्तऐवजात, जागतिक बँकेने म्हटले आहे की भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा DPI चा प्रभाव आर्थिक समावेशापेक्षा जास्त आहे. दस्तऐवजात भारताचे कौतुक करताना जागतिक बँकेने म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने ते केलंय जे गेल्या पाच दशकांत जे साध्य केले नाही. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने 50 वर्षांचे काम 6 वर्षात केले आहे. जे जगभरातील जीवन बदलू शकते. यामध्ये UPI, जन धन, आधार, ONDC आणि Cowin सारख्या गोष्टींचा समावेश आहे.

भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत

G20 शिखर परिषदेपूर्वी तयार करण्यात आलेल्या जागतिक बँकेच्या दस्तऐवजात, जागतिक बँकेने म्हटलेकीस मोदी सरकारने सुरू केलेल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांना आकार देण्याचे काम केले आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की JAM (जन धन, आधार, मोबाइल) त्रिमूर्ती – सर्वांसाठी बँक खाती, आधार आणि मोबाइल कनेक्टिव्हिटीचा अनेकांना फायदा झाला आहे. आर्थिक समावेशन दर 2008 मधील 25% वरून गेल्या सहा वर्षात 80% पेक्षा जास्त झाला आहे, जो DPI मुळे 47 वर्षांपर्यंत खाली आला आहे.

जनधनचा फायदा महिलांना झाला

नरेंद्र मोदी यांनी 20214 मध्ये जन धन योजना सुरू केली होती. त्यानंतर जून 2022 पर्यंत पंतप्रधान जन धन योजना खात्यांची संख्या 14.72 कोटींवरून 46.2 कोटी झाली आहे. यापैकी 56% खाती महिलांची आहेत, जी 26 कोटींहून अधिक आहे.

बँका जोडण्याचे काम

PMJDY ने बँकिंग प्रणालीमध्ये बँकिंग नसलेल्यांना आणले आहे. याशिवाय UPI ने देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली आहे. देशाला पुढे नेण्यात यूपीआयचेही महत्त्वाचे योगदान आहे. भारतात रिटेल डिजिटल पेमेंटसाठी UPI पेमेंट पद्धत खूप लोकप्रिय झाली आहे आणि तिचा वापर झपाट्याने वाढत आहे.

इतर देशांनाही फायदा

UPI चे फायदे केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून इतर देशांनाही त्याचा लाभ मिळू शकतो, यावर भारत सरकारचा भर आहे. आतापर्यंत, श्रीलंका, फ्रान्स, UAE आणि सिंगापूर यांनी उदयोन्मुख फिनटेक आणि पेमेंट सोल्यूशन्सवर भारतासोबत हातमिळवणी केली आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल