आजोबांनी खरेदी केले होते 500 रुपयांचे शेअर; आता नातवाला लागली लॉटरी

| Updated on: Apr 02, 2024 | 6:06 PM

शेअर बाजारात केलेली गुंतवणूक किती फायद्याची आहे, हे चंदीगडच्या या डॉक्टरांच्या अनुभवावरुन तुमच्या लक्षात येईल. या डॉक्टरांच्या आजोबांनी 30 वर्षांपूर्वी एसबीआयचे 500 रुपयांचे शेअर खरेदी केले होते. आता त्या शेअरचे मूल्य आता इतके लाख रुपये झाले आहे.

आजोबांनी खरेदी केले होते 500 रुपयांचे शेअर; आता नातवाला लागली लॉटरी
डॉक्टर बाबू असे झाले मालामाल
Follow us on

चंदीगडमधील एका डॉक्टरला आजोबांमुळे लॉटरी लागली. या डॉक्टर महाशयांना जुन्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या आजोबांनी गुंतवणूक केलेला एक कागद सापडला नी त्यांना सुखद धक्का बसला. डॉ. तन्मय मोतीवाला हे पेशाने डॉक्टर आहेत. ते एक बालरोग तज्ज्ञ आहेत. कुटुंबांच्या संपत्तीचे नियोजन करताना ते कागदपत्रांचा धांडोळा घेत होते. त्यावेळी त्यांना भारतीय स्टेट बँकेचे एक शेअर प्रमाणपत्र (SBI Share Certificate) मिळाले. ही त्यांच्या आजोबांनी केलेली गुंतवणूक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. 1994 मध्ये त्यांनी 500 रुपयांमध्ये एसबीआयचा शेअर खरेदी केला होता. त्यांच्या दादांनी शेअर खरेदी केले. पण ते त्यांनी विक्री केले नाही. कित्येक वर्षांत या गुंतवणुकीचा विसर पडला होता.

आता इतका आहे परतावा

डॉ. मोतीवाला यांच्या आजोबांनी त्यावेळी गुंतवणूक केली होती. पाचशे रुपयांची ही मामूली गुंतवणूक आता लाखोंच्या घरात पोहचली आहे. डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, एसबीआयच्या शेअर्सची किंमत आता 3.75 लाख इतकी आहे. याचा अर्थ या तीन दशकांमध्ये या गुंतवणुकीवर
750 टक्क्यांचा रिटर्न मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

समाज माध्यमांमध्ये पोस्ट

एक्सवर डॉक्टरांनी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये डॉ. मोतीवाल यांनी ही सर्व कथा विस्तृतपणे सांगितली आहे. त्यानुसार, त्याच्या आजी-आजोबांनी 1994 मध्ये 500 रुपयांचे एसबीआयचे शेअर खरेदी केले होते. पण ते दोघे पण ही गुंतवणूक विसरले. त्यांना आपण अशी काही गुंतवणूक केल्याचे स्मरणात पण राहिले नाही. पण कुटुंबांच्या संपत्तीविषयी नियोजन करावे. कागदपत्रे एकत्र करावीत यासाठी जुळवाजुळव सुरु असताना गुंतवणुकीची कागदपत्रं मिळाली.

500 रुपयांचे झाले 3.75 लाख

या गुंतवणुकीचे चांगले फळ मिळाली आहेत. 500 रुपयांची ही गुंतवणूक आता 3.75 लाख रुपये इतकी आहे. आजच्या हिशोबाने तशी ही मोठी रक्कम नाही. पण 500 रुपयांच्या गुंतवणुकीच्या हिशोबाने हा आकडा फार मोठा आहे. 30 वर्षांमध्ये 750 पट परतावा या गुंतवणुकीतून मिळाला आहे. त्यांनी स्टॉक सर्टिफिकेट डीमॅटमध्ये हस्तांतरीत करुन घेतले. त्यासाठी त्यांनी मित्रांची, तज्ज्ञांची मदत घेतली. पण ही प्रक्रिया अत्यंत किचकट आणि थकवणारी ठरली. तरीही डॉक्टरांनी जिद्द सोडली नाही. सर्व दिव्य पार केल्यानंतर, त्रुटी दूर केल्यानंतर हे शेअर त्यांच्या डीमॅट खात्यात आली.

शेअर विकणार नाही

डॉ. मोतीवाला यांनी हे शेअर विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे शेअर ते तसेच शाबूत ठेवणार आहेत. डॉक्टरांना पैशांची गरज नाही. तसेच ही आजोबांची आठवण म्हणून ते शेअर तसेच गाठीशी ठेवणार आहे. त्यामुळे भविष्यात अजून या गुंतवणुकीला मोठी फळं लागणार आहेत.