पेप्सिकोची भारतात दमदार वाटचाल, मोठ्या गुंतवणूकीमुळे शीतपेय बाजारात घमासान

शीतपेय आणि सीलबंद खाद्य पदार्थ तयार करणारी आघाडीची कंपनी पेप्सिकोने मोठी विस्तार योजना आखली आहे. त्यातंर्गत कंपनी मध्य प्रदेशातील उज्जैन औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. कंपनी जवळपास 1,266 कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. त्यामुळे शीतपेय बाजारात सध्या वातावरण टाईट झाले आहे.

पेप्सिकोची भारतात दमदार वाटचाल, मोठ्या गुंतवणूकीमुळे शीतपेय बाजारात घमासान
पेप्सिकोचा डाव, शीतपेय बाजारात घमासान
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 5:01 PM

पेप्सिको इंडियाने विस्तार योजना आखली आहे. त्यांतर्गत मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये कंपनीने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी कंपनीने 1,266 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा प्रकल्प 22 एकरावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे पेप्सिकोला देशात शीतपेयाची बाजारपेठ काबीज करण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. यामुळे स्थानिकच नाही तर इतर ठिकाणी पण अप्रत्यक्षरित्या रोजगार निर्मिती होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल होईल. या प्रकल्पाचे काम याच वर्षी हाती घेण्यात येत आहे. 2026 मधील पहिल्या तिमाहीत पेप्सिको इंडियाचा हा प्रकल्प सुरु होण्याची शक्यता आहे.

मोठा बदल 

पेप्सिकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण एशिया) जागृत कोटेचा यांच्यानुसार, मध्य प्रदेश सरकारने या प्रकल्पासाठी पाठबळ दिले. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक बदल घडून आणण्यास मदत होईल. प्रकल्पाचा विस्तार होईल. पेप्सिको इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बेव्हरेजेज जॉर्ज कोवूर यांनी सांगितले की, उज्जैनचा नवीन प्रकल्प फ्लेवर उत्पादनासाठी सुविधा देईल. कंपनीकडे सध्या पंजाब राज्यात चन्नो येथे एक फ्लेवअर उत्पादन सुविधा प्रकल्प आहे.

हे सुद्धा वाचा

व्हिएतनाममध्ये पण गुंतवणूक योजना

सनटोरी पेप्सिको व्हिएतनाम बेव्हरेजसह 60 हून अधिक अमेरिकन उद्योगांच्या यात्रेदरम्यान पेप्सिकोने व्हिएतनाममध्ये दोन नवीन अक्षय ऊर्जेवर प्रकल्प उभारण्यासाठी गुंतवणुकीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या देशात कंपनी 400 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

ही पण आहे योजना

शीतपेय आणि खाद्य पदार्थ निर्मितीत आघाडीची कंपनी पेप्सिको आसाममधील नलबारी येथे उद्योग उभारत आहे. पहिला अन्न उत्पादन कारखाना उभारण्यासाठी कंपनी 778 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प 44.2 एकरावर उभारण्यात येईल. 2025 मध्ये हा प्रकल्प सुरु होणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. आसाममधील 500 लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

पेप्सिकोच्या प्रकल्पात 75 टक्के महिला

पेप्सिको इंडियाने महिला सशक्तीकरणाचा नारा दिला आहे. त्यानुसार, या प्रकल्पात आजूबाजूच्या महिलांना रोजगार देण्यात येणार आहे. या महिलांना आसाम कौशल्य विकास मिशनतंर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी कौशल्य विकास मिशन, रोजगार आणि शिल्पकार प्रशिक्षण निदेशालयासोबत एक त्रिपक्षीय MoU करण्यात आला आहे. कंपनी या प्रकल्पात 75 टक्के महिलांना रोजगार देण्याच्या तयारीत आहे.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.