AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th Pay Commission: DA 31% झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20484 पर्यंत वाढ होणार, गणित समजून घ्या

केंद्र सरकारने अलीकडेच डीए 17 टक्के वरून 28 टक्के करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी कोरोना संकटामुळे सरकारने गेल्या वर्षी जून 2021 पर्यंत डीए तात्पुरता बंद केला होता.

7th Pay Commission: DA 31% झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20484 पर्यंत वाढ होणार, गणित समजून घ्या
Equity Mutual Funds
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 7:40 AM
Share

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पुन्हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना चांगली बातमी देण्याची तयारी करीत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्याची घोषणा (डीए आणि डीआर वाढ) होणार आहे. याचा 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल. केंद्र सरकारने अलीकडेच डीए 17 टक्के वरून 28 टक्के करण्याची घोषणा केली होती. यापूर्वी कोरोना संकटामुळे सरकारने गेल्या वर्षी जून 2021 पर्यंत डीए तात्पुरता बंद केला होता.

दिवाळीपर्यंत डीए 3 टक्क्यांनी वाढेल!

केंद्र सरकारने जुलै 2021 साठी महागाई भत्ता अद्याप निश्चित केलेला नाही. जानेवारी ते मे 2021 साठी ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) मधील डेटानुसार त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली जाऊ शकते. असे झाल्यास महागाई भत्ता 31 टक्क्यांपर्यंत पोहोचेल. मोदी सरकार दसरा किंवा दिवाळीच्या आसपास डीए वाढवण्याची घोषणा करेल. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या महागाई भत्त्यात 11 टक्के वाढ झालीय. सरकारने जुलै 2021 पासून ते 28 टक्के केले. आता जर जून 2021 मध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली, तर महागाई भत्ता 31 टक्क्यांवर पोहोचेल. अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 50,000 रुपये असेल तर त्याला 15,500 रुपये डीए मिळेल.

वार्षिक वेतन वाढ कशी मोजली जाईल?

जर कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 56,900 रुपये असेल, तर नवीन महागाई भत्ता अर्थात 31 टक्के अंतर्गत 17,639 रुपये दरमहा डीए असेल. त्याच वेळी 28 टक्के दर दरमहा 15,932 रुपये असेल म्हणजे एकूण महागाई भत्ता दरमहा 1,707 रुपयांनी वाढेल. अशा प्रकारे पगारामध्ये एकूण वाढ 20,484 रुपये वार्षिक असेल. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग आहे. देशातील महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. तो वेळोवेळी वाढवला जातो. निवृत्तीवेतनधारकांना हा लाभ महागाई निवारणाच्या स्वरूपात मिळतो.

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा

बापरे! सुकन्या समृद्धी योजनेत जमा केलेले लाखो रुपये पोस्टातून गायब, नेमकं प्रकरण काय?

7th Pay Commission: If DA becomes 31%, the salary of the employees will increase till 20484, know more

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.