Adani Share : अदानी ग्रुप ठरला जादुई चिराग! 101 दिवसांत कमावले 8500 कोटी, कोण आहे हा बाजीगर

| Updated on: May 23, 2023 | 4:35 PM

Adani Share : अदानी ग्रुप या व्यक्तीसाठी जादूच्या दिव्यापेक्षा कमी ठरला नाही. कारण अवघ्या 101 दिवसांत या व्यक्तीने 8500 कोटी कमावले आहेत. कोण आहे हा नशीबवान गुंतवणूकदार

Adani Share : अदानी ग्रुप ठरला जादुई चिराग! 101 दिवसांत कमावले 8500 कोटी, कोण आहे हा बाजीगर
कमाईच कमाई
Follow us on

नवी दिल्ली : जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे जबरदस्त फायदेशीर ठरते. काही असंच या व्यक्तीच्या बाबतीत घडलं. त्याला अदानी ग्रुप हा (Adani Group) अलादीनच्या जादुई दिव्यासारखाच हाती लागला. योग्य वेळी केलेली गुंतवणूक राजीव जैन यांना हजारो कोट्यवधींची मालक करुन गेली. अमेरिकी शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गच्या (Hindenburg Report) अहवालानंतर गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या शेअरची विक्री करण्याचा सपाटा लावला. त्यावेळी 7 वर्षे जुनी असलेली गुंतवणूक फर्म GQG Partners चे सहसंस्थापक राजीव जैन (Rajiv Jain) यांनी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणुकीचा मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला.

101 दिवसांत 8500 कोटींची कमाई
तर राजीव जैन यांनी मोक्का साधला. त्यांनी ही संधी शोधली आणि तिचं सोनं केलं. अदान समूहाच्या भवितव्याविषयी तज्ज्ञ अंदाज बांधत असतानाच आणि गुंतवणूकदार शेअर विक्री करत असताना जैन यांनी गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. त्यांना अदानी समूहातील गुंतवणुकीतून केवळ 101 दिवसांत जवळपास 8500 कोटींचा फायदा झाला.

15,446 कोटी रुपयांची केली गुंतवणूक
राजीव जैन यांनी अदानी समूहातील 4 कंपन्यांमध्ये 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. राजीव यांनी अदानींच्या 4 शेअरमध्ये, अदानी इंटरप्राईजेस, अदानी पोर्टस आणि स्पेशल इकोनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रांसमिशनमध्ये गुंतवणूक केली. अदानींच्या सर्वच शेअरमध्ये तेजीचे सत्र असल्याने सध्या त्यांच्या या गुंतवणुकीचे मूल्ये पण वधारले आहे. या गुंतवणुकीचे बाजारातील मूल्य जवळपास 24 हजार कोटी रुपये आहे. अदानी समूहात या पडत्या काळात ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना प्रचंड फायदा झाला.

हे सुद्धा वाचा

सुप्रीम दिलासा
सुप्रीम कोर्टाच्या विशेष समितीच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला होता. समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर तुफान तेजीत आहे. सोमवार आणि आज मंगळवारी तेजीचे सत्र कायम होते. काल पण हे शेअर 19 टक्क्यांनी वधारले. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीने अदानी समूहाच्या शेअरमधील भावात कोणतीच गडबडी नसल्याचा अहवाल दिला होता. याविषयीचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. सेबीच्या तपासातही काहीच हाती लागले नसल्याचे समोर आले आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र
अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅसमध्ये 5 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. कालही या शेअरमध्ये अपर सर्किट लागले होते. एनडीटीव्ही आणि एसीसी सिमेंटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीच्या सत्रामुळे अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे संयुक्त बाजार मूल्यांकन 10,16,212.15 कोटी रुपयांवर पोहचले आहे.