8th Pay Commission : सरकारी कर्मचारी मालामाल होणार, आता बेसिक पगारात… मोठी अपडेट समोर
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टर आणि इतर घटकांवर अवलंबून असतो. तसेच कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये महागाई भत्ता मर्ज होणार असल्याचेही बोलले जात आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

सरकारी कर्मचारी सध्या आठव्या वेतन आयोगाच्या प्रतीक्षेत आहेत, कारण यानंतर पगारात भरघोस वाढ होणार आहे. मात्र नवीन वेतन लागू झाल्यानंतर हातात किती जास्त पैसे मिळणार असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा फिटमेंट फॅक्टर आणि इतर घटकांवर अवलंबून असतो. तसेच कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीमध्ये महागाई भत्ता मर्ज होणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. असं असलं तरी फिटमेंट फॅक्टर, DA मर्जर आणि नवीन बेसिक पेच्या आधारे पगारवाढीचे वेगवेगळे अंदाज समोर येत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करणार?
8व्या केंद्रीय वेतन आयोगाने कर्मचारी, कर्मचारी संघटना आणि इतर संबंधित घटकांकडून सूचना व माहिती घेण्याची प्रक्रिया जुलैमध्ये पूर्ण केली आहे. आता या सूचनांचा अभ्यास केला जाणार आहे. त्याआधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन आणि इतर लाभांमध्ये बदल करण्याबाबत शिफारसी केल्या जाणार आहेत. आयोगाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये विविध राज्यांमधील कर्मचारी आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या भेटीचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. दिल्लीशिवाय चेन्नई, पुद्दुचेरी, चंदीगड, जयपूर आणि मुंबई येथे बैठका प्रस्तावित आहेत. या बैठकींमध्ये कर्मचारी, पेन्शनधारक, रेल्वे आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रतिनिधी आपल्या मागण्या मांडणार आहेत.
पगारात किती वाढ होऊ शकते?
8व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी किती वाढ होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या समोर येणारे आकडे केवळ अंदाज आहेत.
- कमीत कमी पगारवाढ : सुमारे 20 ते 30 टक्के
- मध्यम पगारवाढ : सुमारे 30 ते 50 टक्के
- सर्वाधिक पगारवाढ : 80 टक्क्यांहून अधिक
महत्त्वाची बाब म्हणजे, पगारात नेमकी किती वाढ होईल, हे फिटमेंट फॅक्टर किती निश्चित केला जातो, तुमचा सध्याचा बेसिक पे किती आहे आणि महागाई भत्ता (DA) बेसिक पे मध्ये मर्ज केला जातो की नाही, यावर अवलंबून असणार आहे. यानुसार वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या प्रमाणात पगार वाढेल.
फिटमेंट फॅक्टर का महत्त्वाचा आहे?
फिटमेंट फॅक्टर हा असा गुणक आहे, ज्याच्या आधारे सध्याच्या बेसिक सॅलरीचे नवीन बेसिक सॅलरीमध्ये रूपांतर केले जाते. 8व्या केंद्रीय वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर अद्याप निश्चित झालेला नाही. विविध कर्मचारी संघटना आणि अहवालांनुसार तो 2.28 ते 3.83 दरम्यान असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
DA मर्जरमुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार
DA म्हणजेच महागाई भत्ता बेसिक पे मध्ये विलीन करण्याची मागणी ही कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक आहे. जर DA चे बेसिक पे मध्ये विलिनीकरण झाले, तर त्याचा परिणाम PF, पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि इतर भत्त्यांवरही होऊ शकतो. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.