AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले! Fitment Factor मुळे घसघशीत पेमेंट?

8th Pay Commission Fitment Factor: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कर्मचारी संघटना या पगार वाढ, निवृत्ती वेतनातील सुधारणा आणि वार्षिक बोनस आणि अनुषांगिक लाभासाठी आग्रही असतानचा फिटमेंट फॅक्टरविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले! Fitment Factor मुळे घसघशीत पेमेंट?
8 वेतन आयोग फिटमेंट फॅक्टरImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 22, 2026 | 12:27 PM
Share

8th Pay Commission Fitment Factor: 8 व्या वेतन आयोगाविषयी चर्चांना उधाण आले आहे. कर्मचारी संघटना मोठी पगार वाढ, पेन्शनमध्ये सुधारणा, वार्षिक वेतनात चांगली वाढ, लाभ आणि अनुषांगिक भत्ते यासाठी आग्रही आहे. तर नवीन वेतन आयोगाचे सदस्य देशभरात दौरे काढत आहेत. प्रत्येक भागात जात तिथल्या कर्मचारी संघटनांकडून अपेक्षा जाणून घेत आहेत. कर्मचारी संगटना, सेवानिवृत्तीधारक आणि इतर संघटनांशी बैठका सुरू आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाकडून घसघशीत पगार वाढ अपेक्षित आहे. कर्मचारी संघटना त्यासाठी आक्रमक झाल्या आहेत.

8 व्या वेतन आयोगाविषयी मोठी अपडेट

1. कर्मचारी संघटनांसोबत आयोगाचे बैठक सत्र

8 व्या वेतन आयोगाने दिल्लीत संरक्षण आणि रेल्वे संघटनांसोबत प्रदीर्घ चर्चा केली. बैठकीत गंभीर चर्चा झाली. आयोगाच्या सदस्यांनी कर्मचारी संघटनांचे म्हणणे जाणून घेतले. वेतन, पेन्शन आणि इतर अपेक्षांची माहिती घेतली. संघटनांनी कोरोना काळातील थकबाकीचा विषय सुद्धा समोर आणल्याचे समजते.

2. अनेक राज्यांचे दौरे

आयोगाने तेलंगाणा, जम्मू आणि काश्मीर आणि लद्दाख या राज्यांचा दौरा केला आहे. येत्या काही महिन्यात आयोग इतर राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात बैठक घेण्याची शक्यता आहे.

3. कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेणार

कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून मेमोरेंडम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीची तारीख वाढवण्यात आली आहे. आता 31 मे 2026 रोजी पर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी संघटनांना त्यांची बाजू मांडेल. वेतन, पेन्शन , भत्ते आणि सेवांशी संबंधित म्हणणे ऐकून घेण्यासाठी अधिकचा कालावधी देण्यात आला आहे.

4. किमान वेतन वाढवण्याची मागणी

महागाईमुळे आणि खर्च वाढल्याने कर्मचारी संगघटनांनी किमान वेतनात मोठी करण्याची मागणी लावून धरली आहे. ही मागणी मान्य करण्याचे मोठे आवाहन आयोगासमोर आहे.

5. फिटमेंट फॅक्टरवर सर्वाधिक जोर

पगार वाढीसाठी कर्मचारी संघटना फिटमेंट फॅक्टरवर सर्वाधिक जोर देत आहेत. अनेक कर्मचारी संघटनांनी 8 व्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची जोरदार मागणी केली आहे. 7 व्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. तो अधिक वाढवण्याची मागणी होत आहे. पण त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

6. वार्षिक वेतनवाढीची मागणी

कर्मचारी संघटनांनी वार्षिक वेतनवाढीवरही जोर दिला आहे. सध्या वार्षिक इन्क्रीमेंट दर हा 3 टक्के आहे. कर्मचारी संगटना हा दर दुप्पट करण्याची मागणी करत आहे. त्यांच्या मागणीनुसार 5-6% इतकी वार्षिक वेतनवाढ व्हायला हवी.

7. पेन्शन आणि DA मध्ये मोठ्या बदलाची मागणी

सेवानिवृत्ती वेतनात आणि महागाई भत्त्यात मोठ्या बदलाची मागणी संघटनांनी केली आहे. अनेक कर्मचारी संघटनांनी पेन्शन समानता, महागाईशी संबंधित वेतन प्रणाली आणि त्यानुसार महागाई भत्ता देण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....