
केंद्र सरकारने लाखो कर्मचारी आणि निवृत्तीधारकांसाठी आनंदवार्ता आणली आहे. नुकताच केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) टर्म्स ऑफ रेफरेंसला (ToR) मंजुरी दिली आहे. याचा अर्थ येत्या काही महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठे बदल दिसू शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे काम सुरु झाले आहे. येत्या काही महिन्यात आयोग त्यांच्या शिफारशी केंद्र सरकारकडे सोपवेल. यापूर्वी आयोग कर्मचारी, सेवा निवृत्तीधारक आणि इतर संबंधीत पक्षांची बाजू समजून घेईल. हरकती आणि सूचना मागवेल.
फिटमेंट फॅक्टरवरुन पगारात वाढ
प्रत्येक वेतन आयोगानुसार यंदा फिटमेंट फॅक्टर पगार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. फिटमेंट फॅक्टर म्हणजे ती संख्या आहे जी जुन्या बेसिक पगाराचा गुणाकार करून येते. ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज आणि एम्बिट कॅपिटलच्या अहवालानुसार, यावेळी फिटमेंट फॅक्टर 1.8 ते 2.46 या दरम्यान असेल.
कोटकच्या अंदाजानुसार, जर 1.8 चा फॅक्टर लागू झाला तर खालील हुद्यावरील कर्मचारी जसे कारकून आणि इतर कर्मचारी यांचे मूळ वेतन18,000 रुपयांहून वाढून 32,400 रुपये होईल. अर्थात ही पगार वाढ 80% पेक्षा अधिक जाणवते. नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्ता (DA) शून्य करण्यात येतो.
DA शून्य होईल?
सध्या कारकून आणि इतर संबंधित हुद्दावरील कर्मचाऱ्यांना 58% DA आणि हाऊस रेंट अलाऊंस (HRA) सह एकूण मिळून जवळपास 29,000 रुपये पगार मिळतो. तर DA रीसेट होऊन शून्य होतो. जेव्हा त्याचे मूळ वेतन वाढेल. तेव्हा DA स्वतंत्रपणे नाही मिळणार तर त्याच्या वेतनाचा एक भाग असेल. यामुळे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन कमी होणार नाही. तर वेतन रचना अजून मजबूत होईल. नवीन मूळ वेतन वाढल्याने HRA, प्रवास भत्ता आणि पेन्शन त्याआधारे निश्चीत होईल.
सेवानिवृत्तीधारकाला मिळेल फायदा
वेतन आयोगाच्या शिफारशी केवळ नोकरदार वर्गापुरते मर्यादीत नाही. पेन्शनर्सची निवृत्तीची रक्कम नवीन मुळ वेतनाच्या आधारे पुन्हा नव्याने मांडण्यात येईल. म्हणजे जेव्हा मुळ वेतनात वाढ होईल. तर तेव्हा पेन्शनच्या रक्कमेतही वाढ होईल.
कर्मचाऱ्यांसाठी काय होतील बदल
DA कमी झाल्याचा अर्थ असा नाही की कर्मचाऱ्यांची कमाई कमी होईल. याचा अर्थ जी रक्कम पहिले स्वतंत्रपणे डीएच्या रुपात मिळत होती. ती आता त्याच्या मूळ वेतनात जमा होईल. यामुळे त्याचे दरमहा वेतन रचना अधिक मजबूत होईल. तर भविष्यातील पगारवाढ आणि निवृत्ती वेतनातही वाढ होईल.