EPFO : कर्मचारी नोंदणी योजना 2025; पात्रता आणि फायदे जाणून घ्या
EPFO Employee Enrolment Scheme 2025 : नवीन ईपीएफओ योजनेची चर्चा सुरू आहे. कर्मचारी नोंदणी योजना काय आहे, त्याची पात्रता आणि फायदे एका क्लिकवर जाणून घ्या.

सामाजिक सुरक्षा योजनेला आणि रोजगार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना चालना देण्यासाठी, त्यांना पाठबळ देण्यासाठी सरकारने एक मोठे पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने ईपीएफओ कर्मचारी नोंदणी योजना 2025 (EPFO Employee Enrolment Scheme 2025) सुरू केली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ईपीएफओच्या 73 व्या स्थापना दिवशी याविषयीची माहिती दिली. ईपीएफओ हा केवळ फंड नाही तर देशातील कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा देणारी संघटना असल्याचे ते म्हणाले. नवीन ईपीएफओ योजनेची चर्चा सुरू आहे. कर्मचारी नोंदणी योजना काय आहे, त्याची पात्रता आणि फायदे जाणून घ्या.
कर्मचारी नोंदणी योजना 2025 ही त्या कर्मचाऱ्यांना नोंदणीची मोठी संधी आहे, ज्यांची कंपनीने ईपीएफ योजनेतंर्गत नोंद केलेली नाही. कामगार मंत्रालयानुसार, या योजनेत आता कर्मचाऱ्याने नोंदणी जरी केली तरी त्याला कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफमध्ये मागील योगदान देण्याची गरज नाही. त्याला मागील पीएफ योगदान आधी कापले गेले नसेल तर ते द्यावे लागणार नाही. तर त्याऐवजी कंपनीला, नियोक्त्याला केवळ 100 रुपये दंड भरावा लागेल. या सवलतीचा उद्देश कंपन्यांवरील ईपीएफ नियमाचे पालन करण्याचा भार कमी करणे आणि स्वेच्छेने कर्मचारी सहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे.
नवीन योजनेसाठी कोण पात्र?
ही योजना त्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे, ज्यांनी विविध कंपनीत 1 जुलै 2017 ते 31 ऑक्टोबर 2025 या काळात नोकरीला सुरुवात केली आणि त्यांची यापूर्वी ईपीएफअंतर्गत नोंदणी झालेली नाही. जे कर्मचारी सध्या कंपन्यांमध्ये या कालावधीत काम करत आहेत आणि नियोक्त्यांना त्यांना पात्र घोषीत केले आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. नियोक्ता, कंपन्यांना कामगार मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे. या कालावधीत जर तांत्रिक कारण अथवा इतर कारणांमुळे या कर्मचाऱ्यांची नोंद केली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तर कर्मचाऱ्याला या योजनेतंर्गत पगारातील रक्कम बचतीचे आणि त्यावर व्याज मिळवता येईल. तसेच त्यांना विम्याचाही फायदा मिळेल.कुटुंबाला विम्याची रक्कम मिळेल.
कर्मचाऱ्यांना मिळेल फायदा
कर्मचाऱ्यांना या योजनेतंर्गत सामाजिक सुरक्षा मिळेल. त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल. कर्मचाऱ्याने या नवीन योजनेतंर्गत नोंदणी केल्यावर त्याला पीएफ योजनेचे फायदे मिळतील. त्याच्या योगदानावर व्याज मिळेल.
प्रोव्हिडन्ट फंडमध्ये बचत होईल आणि व्याजाची रक्कम मिळेल
कर्मचाऱ्यांना कर्मचारी निवृत्ती योजनेतंर्गत फायदा मिळेल
तर इम्प्लॉईज डिपॉजिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमतंर्गत विम्याचे संरक्षण मिळेल.
