
पगार वाढणारsss, पगार वाढणारsss पण नेमका किती पगार वाढणार? हे अनेकांना कळतच नाही. आठव्या वेतन आयोगानंतर तुमचा पगार किती होईल? हे तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. आज आम्ही तुम्हाला अगदी सोप्या भाषेत तुमचा पगार आठव्या वेतन आयोगानंतर किती असेल, याची माहिती देणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया.
आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार आहे. प्रत्येक वेतन आयोगात वेतनवाढ तर होतेच, पण त्याचा थेट परिणाम DA, फिटमेंट फॅक्टर आणि HRA म्हणजेच घरभाडे भत्त्याच्या दरांवरही होतो. अशा परिस्थितीत सरकार आठव्या वेतन आयोगातील HRA दरात बदल करणार का, हा चर्चेचा विषय आहे.
आम्ही म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक वेतन आयोगाबरोबर सरकार एकदा HRA दरांमध्ये ही सुधारणा करते. सहाव्या वेतन आयोगात HRA चे दर 30 टक्के (X सिटी), 20 टक्के (Y सिटी) आणि 10 टक्के (Z सिटी) करण्यात आले. त्याचबरोबर सातव्या वेतन आयोगातही त्यात सुधारणा करण्यात आली. हे दर सुमारे 24,16,8 टक्के होते. परंतु महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचताच HRA पुन्हा 30, 20, 10 टक्के करण्यात आला. याचा अर्थ HRA दर थेट DA आणि ‘बेसिक पे’शी संबंधित आहेत. त्यामुळे यंदाही सरकार मूळ वेतन व महागाई भत्ता रचनेनुसार आठव्या वेतन आयोगात पुन्हा एकदा HRA दरांचा आढावा घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आतापर्यंत आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवून 1.92 करण्याची चर्चा आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या सध्याच्या मूळ वेतनात 1.92 ने गुणाकार करून नवीन वेतनआधार निश्चित केला जाईल. हे उदाहरण द्यायचे झाले तर तुमचा बेसिक पगार 30 हजार रुपये असेल तर नवीन पगार 30 हजार × 1.92 = 57,600 होईल. अशा तऱ्हेने HRA चे गणितही नव्या बेसिकवर असणार आहे. ज्यामुळे HRA ची रक्कम वाढणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, HRA दर बदलण्याची शक्यता आहे. प्रत्येक वेळी नवीन वेतन आयोग लागू होतो तेव्हा HRA मध्येही वाढ होते. सरकार HRA दरात बदल करू शकते, अशी चर्चा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातातील पैसे तर वाढतीलच, पण DA 25 टक्के आणि 50 टक्के असेल तर त्याच्या रिव्हिजनमध्येही तरतूद असेल.