AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: नवीन वेतन आयोग केव्हा सोपवणार अहवाल? सरकारने दिले उत्तर

8th Pay Commission Report: 8 व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल सादर करण्याची अंतिम मुदत काय असेल याविषयीची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिली आहे. आयोगाला चर्चा, बैठकीनंतर अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पण अहवाल कधी सादर करणार याविषयीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

8th Pay Commission: नवीन वेतन आयोग केव्हा सोपवणार अहवाल? सरकारने दिले उत्तर
8 वे वेतन आयोग
| Updated on: Aug 14, 2026 | 6:18 PM
Share

8 व्या वेतन आयोग स्थापन झाल्यानंतर अनेक शहरात आयोगाचे दौरे सुरू आहेत. या ठिकाणी आयोग कर्मचारी संघटना, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यांच्या मागण्या जाणून निवेदन स्वीकारत आहेत. सेवा निवृत्तीदार आणि कर्मचारी यांचे म्हणणे काय हे आयोग समजून घेत आहे. सरकारने नवीन वेतन आयोगाला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली आहे. या कालावधीत आयोगाला केंद्रीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांचे वेतन, भत्ते, पेन्शन आणि सेवा शर्तींविषयी शिफारशी सादर कराव्या लागतील.

केव्हा संपणार 18 महिन्यांची मुदत?

8 व्या वेतन आयोगाची स्थापना ही 3 नोव्हेंबर 2025 रोजी झाली होती. सरकारने आयोगाला काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे आयोगाचे कामकाज मे 2027 पर्यंत चालेल. केंद्र सरकारने आयोगाला त्यांच्या शिफारशी दाखल करण्यासाठी कोणतीच निश्चित तारीख दिलेली नाही. त्यामुळे मे 2027 पर्यंत आयोग त्यांच्या शिफारशी सादर करतील.

संसदेत काय दिले उत्तर?

अर्थ मंत्रालयाने संसदेत नुकतेच याविषयीचे एक उत्तर दिले. त्यानुसार आयोग स्थापन झाल्याच्या 18 महिन्यात त्यांना शिफारशी सादर करणे गरजेचे आहे. अद्याप आयोगाचे कामच सुरू आहे. त्यांच्याकडून शिफारशींची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. सरकारने हे स्पष्ट केले की, आयोग केंद्राला नियमितपणे रिपोर्टिंग करण्यासाठी बांधील नाही. आयोग त्यांचे कामकाज करणे आणि प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र आहे. मार्च ते मे 2027 या काळात आयोगाच्या शिफारशी येण्याची दाट शक्यता आहे. शिफारशींना सरकारने मंजूरी दिल्यानंतर नवीन वेतन आयोग लागू होईल. या सर्व प्रक्रियेला एक ते दोन वर्ष लागू शकतात.

आयोग सध्या काय करतोय?

सध्या आयोग विविध शहरात जाऊन कर्मचारी संघटना, कर्मचारी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करत आहे. त्यांची बाजू ऐकून घेत आहे. त्यांच्या मागण्यांवर विचार करत आहे. त्याआधारे एक अखेरचा प्रस्ताव तयार करण्यात येईल. विविध राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात आयोग पोहचला आहे. यामध्ये जयपुर, चेन्नई, पुद्दुचेरी, चंदीगड, दिल्लीसह इतर काही ठिकाणी आयोगाने कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली. आता इतर शहरात लवकरच आयोगाचे सदस्य जातील आणि मागण्या ऐकून घेतील.

7th Pay Commission मध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यावेळी मूळ वेतन 7,000 रुपयांहून वाढून 18,000 रुपये इतके करण्यात आले होते. अद्याप 8 व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ठरलेला नाही. अनेक कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. हा खरा कळीचा मुद्दा ठरला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?