AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: हाती पैसा खुळखुळणार, फिटमेंट फॅक्टरनुसार किती पगार वाढणार? गणितच समजून घ्या

8th Pay Commission fitment factor : 8 व्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची आग्रही मागणी करण्यात आलेली आहे. पण हा आकडा 2 ते 2.57 पर्यंत असू शकतो. कर्मचाऱ्यांच्या श्रेणीनुसार, त्यांच्या पगारात अशी वाढ होऊ शकते. त्यांच्या वेतनात किती फरक पडणार?

8th Pay Commission: हाती पैसा खुळखुळणार, फिटमेंट फॅक्टरनुसार किती पगार वाढणार? गणितच समजून घ्या
फिटमेंट फॅक्टरनुसार किती पगार वाढणार?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Aug 12, 2026 | 11:53 AM
Share

8th Pay Commission विषयी केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि सेवानिवृत्तीधारकांची अपेक्षा वाढली आहे. फिटमेंट फॅक्टर किती असणार हे निश्चित नाही. कर्मचारी संघटना आणि प्रतिनिधींनी फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची आग्रही मागणी केली आहे. तर एका अंदाजानुसार हा आकडा 2, 2.38 वा 2.57 इतका असू शकतो. त्याचा विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांवर फरक दिसून येईल. त्यांच्या मूळ आणि वाढीव पगारावर त्याचा परिणाम दिसेल. 8 वा वेतन आयोग सध्या कर्मचाऱ्यांच्या सूचना, हरकती आणि मागण्यांचा विचार करत आहे.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

औद्योगिक कामगारांसाठी महागाई निर्देशांक (AICPI-IW) आधारे फिटमेंट फॅक्टर ठरतो. त्या आधारे मूळ वेतनात बदल दिसतो. सध्याचे मूळ वेतन × फिटमेंट फॅक्टर = संशोधित मूळ वेतन असा हा फॉर्म्युला आहे. 7th Pay Commission मध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यावेळी मूळ वेतन 7,000 रुपयांहून वाढून 18,000 रुपये इतके करण्यात आले होते. अद्याप 8 व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ठरलेला नाही. अनेक कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

35,400 रुपये वेतनदाराला किती फायदा

कर्मचारी 6 व्या श्रेणीनुसार काम करत असेल आणि समजा त्याचे मूळ वेतन 35,400 रुपये इतके असेल, फिटमेंट फॅक्टर 2 इतके असेल तर त्याचे मूळ वेतन 70,800 इतके होईल. फिटमेंट फॅक्टर 2.38 नुसार मूळ वेतन 84,252 रुपये आणि 2.57 च्या अनुषंगाने हे वेतन 90,978 रुपये इतके होईल. एकूण वेतन वाढ 87,792 रुपये, 1,04,472 रुपये अथवा 1,12,813 रुपयांपर्यंत होईल. म्हणजे सध्याच्या ग्रॉस वेतनाच्या तुलनेत ही वाढ जवळपास 31%, 55% आणि 68% इतकी असेल.

श्रेणी 7 आणि श्रेणी 8 ला किती फायदा?

श्रेणी 7 आणि श्रेणी 8 मधील कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 44,900 रुपये गृहित धरले. फिटमेंट फॅक्टर 2 नुसार नवीन वेतन 89,800, 2.38 आधारे 1,06,862 आणि 2.57 आधारे 1,15,393 रुपये इतका मूळ पगार होईल. तर अंदाजे ग्रॉस वेतन 1,11,352 रुपये, 1,32,509 रुपये आणि 1,43,087 रुपये इतकी होऊ शकते. तर श्रेणी आठमधील कर्मचऱ्यांचे मूळ वेतन 47,600 गृहीत धरल्यास फिटमेंट फॅक्टर 2 वर 95,200 रुपये, 2.38 आधारे 1,13,288 आणि 2.57 आधारे 1,22,332 रुपये वेतन वाढ होऊ शकते. तर अंदाजे वाढीव वेतन क्रमशः 1,18,048 रुपये, 1,40,477 रुपये आणि 1,51,692 रुपये असू शकते.

8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी मार्च ते मे 2027 या काळात येण्याची दाट शक्यता आहे. शिफारशींना सरकारने मंजूरी दिल्यानंतर नवीन वेतन आयोग लागू होईल. तरी या सर्व प्रक्रियेला एक ते दोन वर्ष लागण्याची शक्यता आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर किती असेल याविषयीची कोणताही माहिती समोर आलेली नाही. आयोग प्रतिनिधी आणि कर्मचारी संघटनांची मतं जाणून घेत आहे.

Follow Us
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?