
8th Pay Commission : केंद्र सरकारने नुकतेच 8 व्या वेतन आयोगासाठी Terms of Reference (ToR) ला मंजुरी दिली आहे. आयोग आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाविषयी निर्णय घेणार आहे. नवीन वेतन आयोग हा 1 जानेवारीपासून लागू होईल. पण वेतन वाढीसाठी वेळ लागणार आहे. तर 8 व्या वेतन आयोगात HRA पण वाढेल का? असा सवाल विचारल्या जात आहे.
8 व्या वेतन आयोगात काय काय वाढणार?
8 व्या वेतन आयोग लागू केल्याने अनेक भत्ते वाढू शकतात. या भत्त्यामध्ये घराचे भाडे, घराचा किराया (HRA), प्रवास भत्ता (TA), शिक्षण भत्ता, आणि वैद्यकीय भत्त्यांचा समावेश आहे. असे मानल्या जात आहे की, वाढती महागाई पाहता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
काय असतो ToR?
8 व्या वेतन आयोगात Terms of Reference म्हणजे ToR अंतर्गत केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांचा वेतन, भत्ता आणि इतर सुविधांबाबत योग्य निर्णय घ्यावा लागेल. याशिवाय देशाची आर्थिक स्थिती, बजेटची मर्यादा आणि राज्य सरकारांवर पडणारा भार याचाही विचार आयोगाला करावा लागणार आहे. खासगी आणि सरकारी कंपन्यांना काय सुविधा देण्यात येतात याचाही विचार करावा लागणार आहे.
8 व्या वेतन आयोगाचे कामकाज सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. त्यांच्याशिवाय इतर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी वेतनात 30-35 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर, कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18 हजार रुपयांहून थेट 33 हजार ते 44 हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी 2014 मध्ये 7 व्या वेतन आयोगाची स्थापन झाली होती. तर 1 जानेवारी 2016 पासून या आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. त्यात वेतन आणि पेन्शनमध्ये 23.55% वाढ झाली. यामुळे सरकारवर वार्षिक जवळपास 1.02 लाख कोटींचा (GDP च्या 0.65%) अतिरिक्त बोजा पडला होता. यामुळे आर्थिक तूट 3.9% हून 3.5% पर्यंत कमी करणे आव्हानात्मक ठरले. सातव्या वेतन आयोगातंर्गत फिटमेंट फॅक्टर 2.57 इतका होता. 8 व्या वेतन आयोगातंर्गत तो 2.86 इतका वाढेल. तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर डीए शुन्य होतो.