ऐन सणासुदीतच कर्जदारांना मोठा झटका? बँकांच्या रेपो रेटमध्ये वाढ होणार? EMI वर मोठा परिणाम होणार
Home Loan Repo Rate: ऐन सणासुदीतच कर्जदारांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. अवघ्या 15 दिवसांनी रेपो दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. SBI Research ने याविषयीचा एक सल्ला आरबीआयला दिला आहे. काय होईल तुमच्या खिशावर परिणाम?

गृहकर्जदारांना ऐन सणासुदीतच झटका बसण्याची शक्यता आहे. SBI Research ने RBI ला ऑक्टोबरमध्ये रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा सल्ला दिला आहे. जर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयने याविषयीचा निर्णय घेतला तर फ्लोटिंग रेट गृहकर्ज दर वाढू शकतो. या सुविधेचा ग्राहकांच्या खिशावर थेट परिणाम होईल. EMI अथवा गृहकर्ज कालावधीवर त्याचा परिणाम होईल. गेल्या काही महिन्यांपासून आरबीआयचा रेपो दर हा स्थिर आहे, अथवा कमी झालेला आहे.
25 BPS दरात वाढीचा सल्ला
SBI Research नुसार, केंद्रीय रिझर्व्ह बँक ऑक्टोबरमध्ये रेपो दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ होऊ शकते. यानंतर डिसेंबर महिन्यात 25 बेसिस पॉईंटची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक पुढील महिन्यात 5 से 7 ऑक्टोबर दरम्यान होण्याची शक्यता आहे. सध्या रेपो दर 5.25 टक्के आणि RBI ने गेल्या चार बैठकींपासून हा रेपो दर कायम ठेवला आहे. कच्चा तेलाचा दर आणि महागाईचचा दबाव यामुळे रेपो दरात वाढीची शक्यता वर्तवली जात आहे.
25 बेसिस पॉईंटची वाढ?
25 बेसिस पॉईंटची वाढ होण्याचा अर्थ व्याज दरात 0.25 टक्के इतकी वाढ होईल. म्हणजे जर रेपो दर 5.25 टक्के असेल तर तो 5.50 टक्के इतका होईल. या व्याजदरात 25 बीपीएसपर्यंत वाढ होईल. रेपो दराच्या आधारावर आरबीआय इतर बँकांना कर्ज देते. जेव्हा रेपो दर वाढतो. तेव्हा बँकांसाठी कर्जाऊ रक्कम महागते. त्याचा परिणाम फ्लोटिंग व्याजदरावर होतो. यामुळे केवळ गृहकर्जच नाही तर वाहन कर्जावरही मोठा परिणाम होतो.
गृहकर्जाच्या EMI किती वाढणार?
जर तुमचे गृहकर्ज फ्लोटिंग व्याजदरावर अवलंबून असेल तर रेपो दर वाढीमुळे तुमच्या गृहकर्जात वाढ होऊ शकते. तुमचा ईएमआय वाढ शकतो अथवा गृहकर्जाचा कालावधी वाढू शकतो. समजा एखाद्या व्यक्तीने 20 वर्षांसाठी 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल आणि व्याजाचा दार 8 टक्के असेल तर EMI जवळपास 41,822 रुपये होईल. जर व्याजदर 8.25 टक्के असेल, गृहकर्जाचा कालावधी 20 वर्षांसाठी असेल तर EMI जवळपास 42,619 रुपये होईल. म्हणजे 25 बेसिस पॉईंटची वाढ झाली तर ग्राहकांचा ईएमआय जवळपास 797 रुपये प्रति महिन्यांनी वाढेल. अर्थात तुमची कर्ज रक्कम, कालावधी, व्याजदर आणि बँकेच्या धोरणावर हे अवलंबून असेल. अर्थात एसबीआय रिसर्चने रेपो दर वाढवण्याची वकिली केली आहे. पण आरबीआयने त्यावर अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
