Twitter : ट्विटरची टिव-टिव एलॉन मस्कला महागात, मालक होण्याच्या नादात इतके कोटी डॉलर बुडाले

कल्याण माणिकराव देशमुख, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 29, 2022 | 9:11 PM

Twitter : Twitter खरेदी करण्यासाठी एलॉन मस्कला मोठी किंमत मोजावी लागली..

Twitter : ट्विटरची टिव-टिव एलॉन मस्कला महागात, मालक होण्याच्या नादात इतके कोटी डॉलर बुडाले
डील पडली महागात
Image Credit source: सोशल मीडिया

नवी दिल्ली : Twitter डील अमेरिकन श्रीमंत व्यावासायिक एलॉन मस्कला (Elon Musk) महागात पडली आहे. कारण या या सौद्यात (Deal) त्याला मोठं नुकसान (Loss) सहन करावं लागलं. मस्कच्या एकूण मालमत्तेला या करारामुळे मोठा झटका बसला आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने (Bloomberg Billionaires Index) याविषयीची माहिती दिली.

या निर्देशांकाच्या दाव्यानुसार, त्याची एकूण संपत्ती 1 हजार कोटींनी घटली आहे. पण यावर कुठलेही भाष्य न करता, मस्कने ट्विटरच्या माध्यमातून पैसा कमवणार नसल्याचे सांगितले तर मानवतेला मदत करण्यासाठी ही डील केल्याचा दावा केला आहे.

या वर्षी एप्रिल महिन्यात एलन मस्कने ट्विटर खरेदी करण्यासाठी करार केला होता. त्यातंर्गत मस्कने 54.20 डॉलर भावाने शेअर खरेदीचा व्यवहार पूर्ण केला. पण 6 महिन्यानंतर मस्कला हा सौदा महागात पडला आहे.

हे सुद्धा वाचा

कारण गेल्या सहा महिन्यांत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात मोठी वाढ केली आहे. अमेरिकेत महागाई ही मोठी समस्या बनली आहे. तर कंपन्यांना या अनिश्चित वातावरणाचा मोठा फटका बसला आहे.

सोलएक्टिव सोशल मीडिया इंडेक्स 40 टक्क्यांनी घसरला आहे. हा निर्देशांक सुचीबद्ध सोशल मीडिया कंपन्यांच्या कामगिरीवर लक्ष्य ठेवतो. त्याआधारे ब्लूमबर्ग वेल्थ इंडेक्सने ट्विटरची बाजारातील मूल्य घटवले आहे. त्यामुळे मस्कची एकूण संपत्तीत मोठी घसरण झाली आहे.

या सौद्यामुळे मस्कच्या नेटवर्थ संपत्तीत 1000 कोटी डॉलरचा फटका बसला आहे. यावर्षी, 2022 मध्ये या अब्जाधीशाला 6600 कोटी डॉलरचे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याची जागतिक कंपनी टेस्लाचे शेअर 35 टक्के घसरले आहे. ही कंपनी इलेक्ट्रिक कार तयार करते.

ट्विटर ताब्यात घेण्यासाठी मस्कला बरीच मेहनत घ्यावी लागली. ट्विटरची मालकी मिळविण्यासाठी मस्क इरेला पेटला. पण यामध्ये त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याला हा करार पूर्ण करणे आवश्यक होते. नाहीतर त्याला कोर्टकचेरीचा सामना करावा लागणार होता.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI