Airtel रिचार्ज महागण्याची शक्यता, सुनील मित्तल यांचे संकेत, 5G बाबत काय म्हणाले?

| Updated on: Jul 02, 2021 | 10:34 AM

दूरसंचार क्षेत्रात जबरदस्त तनाव असल्यामुळे दर वाढवणं गरजेचं आहे. अशावेळी एअरटेल किंमती वाढवण्याबाबत संकोच करणार नाही. मात्र हा निर्णय एकतर्फी नसेल असंही मित्तल यांनी स्पष्ट केलंय.

Airtel रिचार्ज महागण्याची शक्यता, सुनील मित्तल यांचे संकेत, 5G बाबत काय म्हणाले?
एअरटेल
Follow us on

मुंबई : टेलीकॉम इंडस्ट्रीवरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि 5G सेवा सुरु करण्याच्या उद्देशाने मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी Airtel आपल्या टेरिफमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत खुद्द भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी दिले आहेत. दूरसंचार क्षेत्रात जबरदस्त तनाव असल्यामुळे दर वाढवणं गरजेचं आहे. अशावेळी एअरटेल किंमती वाढवण्याबाबत संकोच करणार नाही. मात्र हा निर्णय एकतर्फी नसेल असंही मित्तल यांनी स्पष्ट केलंय. (Airtel’s Richard likely to go up, says Sunil Mittal)

दूरसंचार क्षेत्रात थोडा तणाव आहे असं सांगणं उचित ठरणार नाही. कारण वास्तवात खूप जास्त तणावाची स्थिती आहे. मात्र मला आशा आहे की सरकार, प्राधिकरण आणि दूरसंचार विभाग या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करतील आणि समस्येचं समाधान देतील. सोबतच या गोष्टीवरही लक्ष द्यावी की कमीत कमी तीन ऑपरेटरच्या माध्यमातून भारताचं डिजिटलचं स्वप्न कायम राहील. मित्तल यांनी हे महत्वाचे मुद्दे उपग्रह संचार कंपनी वनवेबच्या एका कार्यक्रमात उपस्थित केले आहेत.

VIL  नुकसान सहन करतेय

टेलीकॉम इंड्रस्ट्रीतील मोठ्या हस्तीने हा मुद्दा त्यावेळी उपस्थित केलाय जेव्हा वोडाफोन आयडियाने एप्रिल 2022 मध्ये 8 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या स्पेक्ट्रम हप्त्याचा भरणा करण्याबाबत 1 वर्षाची सवलत मागण्यासाठी सरकारशी संपर्क केलाय. टेलीकॉम सेक्टरमधील तणावाच्या या स्थितीचा सामना वोडाफोन-आयडिया अर्थात VIL देखील करत आहे. तंगीचा सामना करत असलेल्या VIL ने दूरसंचार विभागाला सांगितलं की ते गेल्या सहा महिन्यात नवी फंडिंग गोळा करण्याचं काम करत आहे, मात्र गुंतवणूकदार कंपनीत गुंतवणूक करण्यास तयार नाहीत.

टेलीकॉम क्षेत्रावर दबाव वाढतोय

मित्तल यांनी VILच्या मुद्द्यावरुन टिप्पणी करण्यास नकार दिलाय. मात्र त्यांनी हे मान्य केलं की टेलीकॉम उद्योग जबरदस्त तणावात आहे. अशावेळी दूरसंचार शुल्क वाढवण्याची गरज आहे. मित्तल यांनी सांगितलं की भारती एअरटेलने शेअर आणि बॉन्डच्या माध्यमातून वेळेवर आणि योग्य प्रमाणात रक्कम जमा केली आहे. तसंच कंपनी येणाऱ्या वर्षांमध्ये बाजाराची सेवा करण्यासाठी मजबुतीने उभी असेल असंही त्यांनी म्हटलंय.

5G सेवांसाठी मार्केटमध्ये टिकून राहण्याची गरज

दूरसंचार उद्योगांना 5G सेवा सुरु करणे आणि भारताचं डिजिटल स्वप्न पूर्ण करण्यासाठी टिकून राहण्याची गरज आहे. त्यासाठी प्रमुख टेलीकॉम कंपन्यांना मार्केटमधील आव्हानांचा सामना करणे आणि टिकून राहण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. त्याकडे सरकारने लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या :

आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज; जाणून घ्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?

काय आहे अमेझॉन पे लेटर सर्व्हिस? जी क्रेडिट कार्डशिवाय लोकांना देतेय उधार सामान

Airtel’s Richard likely to go up, says Sunil Mittal