आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज; जाणून घ्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?

ज्या लोकांनी टीडीएस, टीसीएस, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ अ‍ॅसेस टेस्टमार्फत कर भरला आहे आणि कर भरल्याची रक्कम ही कराच्या देय रक्कमेपेक्षा अधिक आहे, अशाच लोकांना रिफंडवर व्याज मिळू शकेल. (Not everyone gets interest on income tax refunds; know if you can benefit from this)

आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज; जाणून घ्या तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो का?
आयकर रिफंडवर सगळ्यांनाच मिळत नाही व्याज

नवी दिल्ली : अनेक लोक इनकम टॅक्स रिटर्न (आयकर विवरण) भरतात. ज्यांनी गेल्या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे, ते सध्या रिफंडची वाट बघताहेत. अनेक लोकांना या रिफंडबरोबरच त्यावर व्याज किती मिळणार आहे याची उत्सुकता लागली आहे. या लोकांना वाटते की रिफंडवर व्याज मिळेल व आपण त्या माध्यमातून कुठल्यातरी गरजेची पूर्तता करू. जर तुम्हीही रिफंडवर व्याजाची प्रतिक्षा करणाऱ्या मंडळींपैकी एक असाल, तर चिंता करू नका. रिफंडवर व्याज मिळणार आहे की नाही, यासाठी तुम्ही हक्कदार आहात की नाही, ते तुम्ही आधी तपासून घ्या. नियमानुसार प्रत्येक करदात्याला आयकर परताव्याच्या रिफंडवर व्याज मिळत नाही, हेही तुमच्या लक्षात असू द्या. (Not everyone gets interest on income tax refunds; know if you can benefit from this)

हे लोक ठरतात व्याजाचे हक्कदार

ज्या लोकांनी टीडीएस, टीसीएस, अ‍ॅडव्हान्स टॅक्स किंवा सेल्फ अ‍ॅसेस टेस्टमार्फत कर भरला आहे आणि कर भरल्याची रक्कम ही कराच्या देय रक्कमेपेक्षा अधिक आहे, अशाच लोकांना रिफंडवर व्याज मिळू शकेल. जर तुम्हाला 80 हजार रुपयांचा कर भरावा लागत असेल आणि तुम्ही 1 लाख रुपयांची रक्कम भरली आहे तर त्या रिफंडवर तुम्हाला व्याज मिळेल. अशा प्रकारचे व्याज मिळवण्यासाठी काही विशेष नियम आहेत. त्यानुसार ठराविक कालावधीच्या आत आयटीआर फाईल केला तर व्याजाचा लाभ मिळू शकेल.

किती प्रमाणात मिळते व्याज

जर रिफंडची रक्कम ही कराच्या मर्यादेपुढे जात असेल तर त्या रिफंडवर व्याज देण्यात येते. तसेच रिफंड टीडीएस, टीसीएस किंवा अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या रुपात येत असेल तर दरमहा 0.5 टक्क्यांच्या हिशोबाने व्याजाची भर पडू शकेल. प्रत्येक वर्षी एप्रिलमध्ये व्याजदराची गणना सुरू होते. जर कोणता करदाता निर्धारीत तारखेच्या आधी किंवा त्या दिवसापर्यंत आयटीआर भरत असेल तर त्या आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून व्याजाची रक्कम जोडली जाते. रिफंडची रक्कम दिली जाईपर्यंत हे व्याज दिले जाते. निर्धारीत तारखेनंतर आयटीआर फाईल केला असेल तर आयटीआर फाईल केल्याच्या तारखेपासून रिफंड जारी केला जाईपर्यंत व्याज मिळते.

अशा प्रकारे रिफंड तपासू शकता

सामान्य नियमांनुसार जर तुम्ही आपला आयटीआर भरला असेल तर तुम्हाला रिफंड देखील येणार. रिफंडबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्सच्या ई-फायलिंग वेबसाइटवर भेट द्यावी लागेल. तेथे तुम्ही my account-my returns/forms सेक्शनमध्ये जाऊ शकता. तुमचा आयटीआर प्रोसेस झाला आहे का? आयकर विभाग आता आपल्याला रिफंड देणार आहे का किंवा त्यावर किती व्याज देणार आहे, अशा विविध प्रश्नांबाबत तुम्हाला सद्यस्थिती कळू शकेल. (Not everyone gets interest on income tax refunds; know if you can benefit from this)

इतर बातम्या

परदेशींकडे मराठी भाषा डिपार्टमेंट, तीन नव्या दमाच्या IAS ना सीईओची पोस्टिंग, ठाकरे सरकारकडून 7 मोठ्या बदल्या

आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळेच कोरोना वाढतोय, संभाजी भिडेंचं वक्तव्य

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI