AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉलरमध्ये तेजी आल्यामुळे सोने झाले स्वस्त; जाणून घ्या दहा ग्रॅमचा दर

मंगळवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 46,047 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोने चांगलेच स्वस्त झाल्याने सोने खरेदीदारांना याचा मोठा फायदा झाला. (Gold rate became down as the dollar rallied; know the latest rates)

डॉलरमध्ये तेजी आल्यामुळे सोने झाले स्वस्त; जाणून घ्या दहा ग्रॅमचा दर
सोन्याचा दर
| Updated on: Jun 30, 2021 | 9:51 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना महामारीचा सराफा बाजारातील परिणाम अजून तसाच आहे. आज जागतिक बाजारपेठेत सोने-चांदीच्या किंमतीत घसरण झाली. याचदरम्यान देशांतर्गत म्हणजेच स्थानिक पातळीवरही सोने-चांदीच्या किमतीत अशीच घट पाहायला मिळाली. सोने खरेदीदारांसाठी सोने खरेदी करण्याची चांगली संधी यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे. आज देशाची राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोने 264 रुपयांनी स्वस्त झाले. किमतीतील या घसरणीमुळे दिल्लीत आज सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 45,783 रुपये इतका होता. मंगळवारी सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 46,047 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोने चांगलेच स्वस्त झाल्याने सोने खरेदीदारांना याचा मोठा फायदा झाला. (Gold rate became down as the dollar rallied; know the latest rates)

याचदरम्यान दुसरीकडे चांदीच्या किंमतींमध्येही घसरण पाहायला मिळाली. भले सोन्याच्या तुलनेत चांदी अधिक स्वस्त झाली नाही, मात्र प्रति किलोच्या किमतीत 60 रुपयांचा फरक पाहायला मिळाला. चांदीच्या किमतीत झालेल्या 60 रुपयांच्या घसरणीमुळे प्रति किलोग्राम 67,472 रुपयांच्या पातळीवर चांदीचा बाजार बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोने आणि चांदीच्या दरामध्ये बऱ्यापैकी घसरण झाल्याचे चित्र होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोने दर घसरणीसह 1759 डॉलर आणि चांदी 26 डॉलर प्रति आउंसच्या पातळीवर व्यापार करीत होती.

डॉलरमध्ये तेजी दिसून आल्यामुळे सोने-चांदीच्या दरात घसरण

सोने-चांदीच्या दरामधील घसरणीला डॉलरमध्ये दिसून आलेली तेजी कारणीभूत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सीनियर अ‍ॅनालिस्ट तपन पटेल यांनी याबाबत सांगितले की, डॉलरच्या दरात तेजी संचारल्यामुळे बुधवारी सोने दोन महिन्यांतील किमान पातळीवर आले. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या नवनीत दमाणी यांनीदेखील याच कारणाला दुजोरा दिला आहे. त्यांच्या मते, डॉलरमध्ये संचारलेल्या तेजीमुळे सोने-चांदीच्या दराचे चित्र आणखी पालटेल. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोने 1700 डॉलरच्या पातळीवर खाली येऊ शकते.

सोन्याच्या डिलिव्हरीचा दर

एमसीएक्सवर आज संध्याकाळी 6.25 वाजता ऑगस्टमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या दरात 25 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे या सोन्याचा दर प्रति दहा ग्राम 46530 रुपयांच्या पातळीवर खाली आला होता. अशाच प्रकारे ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याच्या दरात 15 रुपयांची घट झाली. या घसरणीमुळे ऑक्टोबर डिलिव्हरीवाल्या सोन्याचा दर आज 46850 रुपयांच्या पातळीवर होता. तसेच डिसेंबरच्या डिलिव्हरीचे सोने 336 रुपयांच्या तेजीसह प्रति दहा ग्राम 47500 रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत होते.

चांदी डिलिव्हरीचा दर

देशांतर्गत बाजारामध्ये चांदीच्या डिलिव्हरीमध्ये तेजीचे वातावरण दिसले. जुलैच्या डिलिव्हरीवाली चांदी 348 रुपयांच्या तेजीसह 67580 रुपयांच्या प्रति किलोग्राम पातळीवर व्यापार करीत होती. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या डिलिव्हरीवाली चांदी 208 रुपयांच्या तेजीसह 68482 रुपये प्रति किलोग्राम पातळीवर आणि डिसेंबरच्या डिलिव्हरीवाली चांदी 136 रुपयांच्या तेजीसह 69734 रुपयांच्या पातळीवर व्यापार करीत होती. (Gold rate became down as the dollar rallied; know the latest rates)

इतर बातम्या

उद्यापासून तुमच्या आवडत्या गाड्या होणार महाग; मारुतीपासून हिरोपर्यंत कंपन्यांनी घेतला दरवाढीचा निर्णय

23 गावांच्या विकासासाठी 9 हजार कोटी रुपये द्या, पुण्याच्या महापौरांची राज्य सरकारकडे मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.