भारतात यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक मोटरसायकल; जाणून घ्या कंपनीचे नियोजन

वैजंता गोगावले, Tv9 मराठी

|

Updated on: Jun 30, 2021 | 8:42 PM

सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक बेसिक स्ट्रक्चर कशाप्रकारे सेट करण्याची योजना आखत आहे, याकडे सध्या यामाहा कंपनीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. (Yamaha to launch electric motorcycles in India; know company planning)

भारतात यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक मोटरसायकल; जाणून घ्या कंपनीचे नियोजन
भारतात यामाहा लॉन्च करणार इलेक्ट्रिक मोटरसायकल
Follow us

नवी दिल्ली : जपानी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी असलेली यामाहा भारतीय बाजारपेठेसाठी एक ईव्ही स्कूटर तयार करणार आहे. कंपनीने आपल्या या योजनेची नुकतीच माहिती शेअर केली होती. ताज्या अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात सरकारचे धोरण निश्चित झाल्यानंतरच कंपनी ही स्कूटर लॉन्च करण्याबाबत विचार करणार आहे. त्यानंतरच देशातील ईव्ही स्कूटरच्या रोडमॅपबाबत अधिक स्पष्टता येणार आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक बेसिक स्ट्रक्चर कशाप्रकारे सेट करण्याची योजना आखत आहे, याकडे सध्या यामाहा कंपनीने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. सरकारच्या योजनेमध्ये पुरेसे चार्जिंग स्टेशन, बॅटरी स्वॅपिंग हब तसेच इतर पर्यायांचा समावेश आहे. सरकारने या विविध सुविधांबाबत कोणती पावले उचललीत हे पाहून यामाहा ईव्ही स्कूटरच्या निर्मितीचे पुढील धोरण ठरवणार आहे. (Yamaha to launch electric motorcycles in India; know company planning)

भारतीय बाजारपेठेसाठी नव्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्याची योजना

यामाहाच्या वतीने अलिकडेच खुलासा करण्यात आला होता की, कंपनी जपानच्या आपल्या मुख्यालयात ईव्हीएससाठी एक नवीन प्लॅटफॉर्म डेव्हलप करीत आहे. या नव्या प्लॅटफॉर्मचा भारतीय आणि जागतिक बाजारपेठांसाठी ईलेक्ट्रीक वाहने बनवण्याकरीता वापर केला जाणार आहे, असेही यामाहाने त्यावेळी स्पष्ट केले होते. कंपनीने आता ईलेक्ट्रीक वाहनांच्या लॉन्चिंगबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

भारत सरकारच्या धोरणाची प्रतिक्षा

ऑटोकार इंडियाच्या अहवालानुसार, यामाहा मोटर्स आपले ईलेक्ट्रीक दुचाकी लॉन्च करण्यापूर्वी भारत सरकारच्या धोरणाची प्रतिक्षा करीत आहे. सरकार इलेक्ट्रीक वाहनांसाठी एक स्थिर स्वरुपाचा रोडमॅप तयार करेल, अशी कंपनीला आशा आहे. सरकार इलेक्ट्रीक वाहनांबाबत गंभीर असल्याचा विश्वासही कंपनीला आहे.

फेम-2 योजनेचा उद्देश

फेम-2 योजनेचा उद्देश सबसिडीच्या माध्यमातून सार्वजनिक आणि शेअर्ड ट्रान्सपोर्टच्या विद्युतीकरणासाठी चालना देणे हा आहे. भारत सरकारचे हे धोरण यामाहा कंपनीला आकर्षित करीत आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 7090 ई-बस, 5 लाख ई-थ्री व्हिलर्स, 55 हजारांच्या आसपास ई-फोर व्हिलर्स पॅसेंजर कार आणि 10 लाखांच्यावर ई-टू व्हिलर्सला सबसिडी दिली जाणार आहे. त्यामुळे भारतात इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमतीत घसरण होईल. याचा नागरिकांना फायदा होऊन प्रदूषणकारी वाहनांऐवजी लोक या वाहनांचा अधिक वापर करू शकतील, अशी आशा आहे. याच सकारात्मक भावनेने यामाहा कंपनीने भारतीय बाजारपेठेकडे लक्ष वळवले आहे. याआधी टीव्हीएस आणि बजाज यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने लॉन्च केली आहेत. तसेच हिरो आणि सुझुकीनेही आपल्या टू-व्हिलर इलेक्ट्रीक वाहनांची घोषणा केली आहे. (Yamaha to launch electric motorcycles in India; know company planning)

इतर बातम्या

काजू-बदाम खाणारा सुलतान ! तब्बल 20 लाखांच्या बोकडची सांगलीत चर्चा

Breaking : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI