अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या उपाध्यक्षांनी महानआर्यमन यांची घेतली भेट, एआय तंत्रज्ञानाबाबत चर्चा

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी भविष्याचा वेध घेत पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. भारताला एआय तंत्रज्ञानाचे केंद्र बनवण्यासाठी सातत्याने पावलं उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर त्याने भारतातील अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या उपाध्यक्षांची भेट घेतली.

अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या उपाध्यक्षांनी महानआर्यमन यांची घेतली भेट, एआय तंत्रज्ञानाबाबत चर्चा
अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या उपाध्यक्षांनी महानआर्यमन यांची घेतली भेट, एआय तंत्रज्ञानाबाबत चर्चा
Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 30, 2026 | 3:28 PM

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि एआय क्षेत्रातील एक तरूण भारतीय उद्योजक असलेल्या महानआर्यमन सिंधिया यांनी देशात एआय तंत्रज्ञानाचे केंद्र तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महानआर्यमन यांना भविष्यात एआय काय करू शकते याचा अंदाज आहे. प्रत्येक क्षेत्रात एआय क्रांती घडवत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. मागच्या महिन्यात महानआर्यमन यांनी सिएटलमधील अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या कार्यालयाला भेट दिली होती. तसेच एआय तंत्रज्ञानाचा वापर आणि इतर गोष्टींची माहिती घेण्यास सुरूवात केली. त्यांनी अ‍ॅमेझॉनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट देखील घेतली. माहिती जाणून घेतल्यानंतर महानआर्यमन यांच्या कंपनीने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) सोबत एका महत्त्वपूर्ण भागीदारीवर स्वाक्षरी केली. ॲमेझॉनच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत एजेंटिक एआयचे भविष्य आणि जागतिक एआय केंद्र म्हणून भारताच्या क्षमतेवर चर्चा झाली.

अ‍ॅमेझॉनसोबत झालेल्या या बैठकीनंतर आणि भागीदारीनंतर अवघ्या चार आठवड्यांनी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या उपाध्यक्षा एलिझाबेथ बेकर यांनी आपल्या टीमसोबत एथारा एआयच्या गुडगाव कार्यालयाला भेट दिली. यावेळी, भारतातील सामान्य उद्योगांमध्ये व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी एआयचा वापर कसा करता येईल यावरील चर्चेला पुढे नेण्यासाठी ही भागीदारी अधिक सक्षम करण्यात आली. अमेझॉन वेब सर्विसेस भारतात पुढील पिढीतील Intelligent Agents साठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण यंत्रणा उभारणार आहेत. दोन्ही कंपन्या प्रबलन शिक्षण पायाभूत सुविधा आणि प्रगत मूल्यांकन प्रणाली विकसित करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत.

महानआर्यमन सिंधिया आणि ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस लवकरच भारतातील सर्व प्रकारच्या उद्योगांचे, विशेषतः मध्यम आणि लहान व्यवसायांचे कामकाज आणि व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी नवीन उत्पादने विकसित करतील. त्यामुळे कामं अचूक आणि अधिक झपाट्याने होण्यास मदत होईल. तसेच देशाच्या विकासाला चालना मिळेल.

Follow Us