अमूल दूध पियेगा अब अमेरिका… भारतीय कंपनीची मोठी घोषणा

| Updated on: Mar 23, 2024 | 5:16 PM

Amul Milk in US : अमूल दूध हा मोठा ब्रँड भारतामधील आहे. अमूल दूधकडून फक्त दूधच नाही तर अनेक दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. अमूल दूधने दुधाच्या किंमती वाढवल्या किंवा कमी केल्या तरीही मोठी चर्चा रंगते. आता नुकताच अमूल दूध कंपनीकडून मोठी घोषणा ही करण्यात आलीये.

अमूल दूध पियेगा अब अमेरिका... भारतीय कंपनीची मोठी घोषणा
Follow us on

अमूल दूध हा देशच नाही तर विदेशातील देखील ब्रँड बनला आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही आपला ठसा अमूल दूधने उमटवला आहे. दूध, चीज, दही, लस्सी, चॉकलेट आणि इतरही दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन अमूलकडून केले जाते. मध्यंतरी एक जाहिरात बघायला मिळाली, अमूल दूध पिता है इंडिया…आता अमूल दूध पियेगा अमेरिका असे म्हणावे लागेल. होय हे खरं आहे…आता अमेरिकन लोक देखील अमूल दूध पिणार आहेत. फक्त भारत किंवा इतरच देश नाही तर अमूल दूध हे अमेरिकेमध्येही मिळणार आहे.

भारताच्या अमूल दूध कंपनीने मोठी झेप घेतलीये. अमूलने अमेरिकेत फ्रेश मिल्क प्रोडक्ट लाॅन्च करण्याचा निर्णय घेतलाय. अमूलने अमेरिकेच्या ईस्ट कोस्ट आणि मिडवेस्ट मार्केटमध्ये ताजे दूध विकण्यासाठी मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशन (MMPA) सोबत करार केला आहे. ही खरोखरच मोठी गोष्ट आहे.

गुजरात को ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी मोठी माहिती शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. संयुक्त राज्य अमेरिकेच्या 108 वर्षे जुन्या डेअरी सहकारी संस्थेशी करार केला आहे. मिशिगन मिल्क प्रोड्युसर्स असोसिएशनच्या कराराची 28 मार्च रोजी झालेल्या वार्षिक बैठकीत घोषणा करण्यात आली.

जयेन मेहता म्हणाले की, अमूल अमेरिकेत अमूल ब्रँड अंतर्गत एक गॅलन (3.8 लिटर) आणि अर्धा गॅलन (1.9 लिटर) पॅकमध्ये ताज्या दुधाची साखळी लॉन्च करेल. भारतामध्ये अमूलच्या ताज्या दूधाची किंमत ही 500 मिली  27 रुपये आणि 180 मिली 10 रुपये याप्रमाणे आहे. या करारानंतर अमूल कंपनींवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.

भारतामध्येही अमूल दूधला मोठी मागणी आहे. फक्त दूधच नाही तर अमूलचे चाॅकलेट आणि आयस्क्रीम देखील मोठे ब्रँड झाले आहेत. जवळपास भारतीयांची सकाळची सुरूवात ही एक ग्लाॅस अमूल दूधाने होते. आता थेट अमेरिकेतही अमूल दूध मिळणार आहे. अमूल दूध कंपनीची ही एकप्रकारची गरूड झेपच म्हणाली लागणार आहे.