Dividend : बँकेच्या व्याजापेक्षा जास्त लाभांश देत आहे ही कंपनी, गुंतवणूकदारांना लागली जोरदार लॉटरी..

Dividend : या कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

Dividend : बँकेच्या व्याजापेक्षा जास्त लाभांश देत आहे ही कंपनी, गुंतवणूकदारांना लागली जोरदार लॉटरी..
लाभांशाची घोषणा
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Nov 23, 2022 | 11:08 PM

नवी दिल्ली : खाण क्षेत्रातील (Mining Area) या कंपनीच्या गुंतवणूकदारांना लॉटरी लागली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार लाभांश (Dividend) जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षात या कंपनीने 17.50 रुपये प्रति इक्विटी शेअरचा लाभांश घोषीत केला आहे. ही कंपनीचा तिसरा लाभांश आहे. शेअर बाजाराला (Share Market) या घडामोडीची कंपनीने माहिती दिली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चांदीच चांदी झाली आहे.

वेदांता समूहाने हा लाभांश जाहीर केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहाने मंगळवारी लाभांशाची माहिती दिली. बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने लाभांश देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

त्यानुसार, या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये शेअर्स होल्डर्सला 17.50 रुपये प्रति इक्विटी शेअरवर लाभांश घोषीत केला आहे. हा तिसरा लाभांश आहे. त्याचा गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा होणार आहे.

हा लाभांश कोणत्याही बँकेच्या व्याज दरापेक्षा अधिक आहे. लाभांशाची रक्कम वाटप करण्यासाठी कंपनीने 30 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. त्यासाठी कंपनीला एकूण 6,505 कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहे.

कंपनीने लाभांश वाटपासाठी 30 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली असून या तारखेच्या आताच गुंतवणूकदारांना त्याचा फायदा होईल. एका अहवालानुसार, वेदांताचे एकूण कर्ज 30 नोव्हेंबर रोजी 58,597 कोटी रुपये आहे.

यापूर्वी या कंपनीने दोनदा लाभांशाचे वाटप केले आहे. कंपनीने पहिला लाभांश 31.5 रुपये तर दुसरा लाभांश 19.50 रुपये दिला होता. दुसऱ्या तिमाहीत या कंपनीच्या नफ्यात घसरण झाली होती.

हे सुद्धा वाचा

जुलै-सप्टेंबर या तीन महिन्यात वेदांताचे एकूण नफ्यात 60.8 टक्क्यांची घसरण होऊन हा निव्वळ नफा 1808 कोटी रुपये झाला होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला निव्वळ 4615 कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें