
अनिल अंबानींना मोठा धक्का ईडीकडून देण्यात आलाय. रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स ग्रुपच्या अडचणी आता मोठी वाढ झालीये. 24 जुलै रोजी ईडीने अनिल अंबानींच्या कंपन्यांवर छापे टाकली होती. आता थेट अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना समन्स पाठवला आहे. तपास यंत्रणेने अनिल अंबानींना 5 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ईडीच्या समन्समुळे मोठी खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय.
छापेमारीनंतर ईडीचा अनिल अंबानींना समन्स
ईडीने छापेमारी दरम्यान अनेक ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे आणि संगणक उपकरणे जप्त केली होती. आता याबद्दल अधिकृत सूत्रांनी माहिती उघड करण्यात आलीये. 3,000 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग अंतर्गत ही सर्व छापेमारी करण्यात आली होती. फक्त हेच नाही तर त्यांच्या काही कंपन्यांवर कोट्यावधी रूपयांचा अनियमिततेचा देखील आरोप आहे.
दिल्लीतील ईडी कार्यालयात राहवे लागणार चाैकशीसाठी उपस्थित
याप्रकरणी मुंबईतील 35 पेक्षा जास्त ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. केंद्रीय अन्वेषण विभागाने दोन एफआयआर दाखल केल्यानंतर ईडीने ही छापेमारी केली होती. ईडीच्या सूत्रांनी यापूर्वी सांगितले होते की, चौकशी मुख्यत्वे 2017-2019 दरम्यान येस बँकेने अनिल अंबानींच्या कंपन्यांना दिलेल्या 3,000 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कर्जांवर ईडीची बारीक नजर होती आणि त्यावरूनच काही आरोप होती.
17,000 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याचे प्रकरण
17,000 कोटी रुपयांच्या कथित कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीने हा समन्स रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांना पाठवला. आता अनिल अंबानी यांना ईडीच्या दिल्लीतील कार्यालयामध्ये 5 ऑगस्ट रोजी चाैकशीसाठी उपस्थित राहवे लागणार आहे. ईडीच्या चाैकशीत पुढे काय होते हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, ईडीने चक्क अनिल अंबानी यांना समन्स पाठवल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. ईडीच्या या समन्सानंतर अजून रिलायन्स समूहाकडून काही भाष्य करण्यात आले नाहीये. मात्र, 5 ऑगस्ट रोजी अनिल अंबानींना चाैकशीसाठी उपस्थित राहणे लागणार आहे.