AWL ॲग्री बिझनेसची चमकदार कामगिरी, FY26 च्या पहिल्या तिमाहीत महसूलात 21% टक्क्यांची वाढ

आघाडीची कंपनी AWL ॲग्री बिझनेस यंदा चमकदार कामगिरी करत आहे. मंगळवारी कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवला आहे.

AWL ॲग्री बिझनेसची चमकदार कामगिरी, FY26 च्या पहिल्या तिमाहीत महसूलात 21% टक्क्यांची वाढ
Gautam Adani
| Updated on: Jul 15, 2025 | 4:40 PM

आघाडीची कंपनी AWL ॲग्री बिझनेस यंदा चमकदार कामगिरी करत आहे. मंगळवारी कंपनीने आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल मिळवला आहे. कंपनीचा पहिल्या तिमाहीतील महसूल 17059 कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीपेक्षा 21 टक्क्यांनी जास्त आहे.

खाद्यतेल व्यवसायामुळे वाढ

कंपनीच्या खाद्यतेल व्यवसायामुळे ही वाढ झाल्याचे समोर आले आहे. या विभागाने आतापर्यंत 13415 कोटींचा महसूल जमवला आहे, जो महसुलाच्या 78.6 टक्के आहे. त्याचबरोबर फूड आणि FMCG व्यवसायातून मिळणारा महसूल ४ टक्क्यांनी वाढला असून तो 1414 कोटी झाला आहे. या विभागाचे एकूण महसुलातील योगदान 8 टक्के आहे.

फूड आणि एफएमसीजी व्यवसाय वाढवण्यावर भर 

कंपनी खाद्यतेल विभागातून मिळणाऱ्या महसूलाचा वापर फूड आणि एफएमसीजी व्यवसाय वाढवण्यासाठी करत आहे. खाद्यतेल विभागातून दरवर्षी सुमारे 1200 ते 1500 कोटींचा निधी मिळतो, ज्यामुळे नवीन व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.

कंपनीची 8.7 लाख आउटलेट्स

ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी एडब्ल्यूएलने किरकोळ कव्हरेज 18 टक्क्यांनी वाढवले आहे. कंपनीची आता 8.7 लाख आउटलेट्स आहेत. यापैकी सुमारे 55 हजार आउटलेट्स ग्रामीण भागातील आहेत. आर्थिक वर्ष 2022 पासून कव्हरेजमध्ये 10 पट वाढ झाली आहे.

कंपनीचा निव्वळ नफा 238 कोटी

कंपनीच्या महसूलात चांगली वाढ झाली आहे, मात्र कंपनीचा निव्वळ नफा सध्या 238 कोटी आहे. कच्च्या मालाच्या खर्चात 25 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे निव्वळ नफा घटला आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांत कच्च्या मालाच्या किमती 10 टक्क्यांनी घटल्या आहेत, त्यामुळे आगामी काळात कंपनीच्या नफ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चांगल्या कामगिरीमुळे AWL कंपनीचा शेअर सध्या 263 रुपयांवर व्यव्हार करत आहे.