
Patanjali Online Order : आज योगगुरू रामदेव बाबा यांची पतंजली ही कंपनी देशातील अनेक अग्रेसर कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीतर्फे आयुर्वेदिक औषधांपासून ते सौंदर्य प्रसाधने, बिस्किटे तसेच रोजच्या वापरतील सामानांची निर्मिती केली जाते. आज या कंपनीची उत्पादने शहरापासून ते गावखेड्यापर्यंत पोहोचलेली आहेत. दरम्यान, आता पतंजली या कंपनीने आपली उत्पादने ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच तुम्हाला पतंजलीची उत्पादने खरेदी करण्यासाठी घराबाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. ऑनलाईन पद्धतीन पतंजलीची उत्पादने खरेदी केल्यास तुम्हाला दहा टक्क्यांपर्यंत सूटदेखील मिळणार आहे.
तुम्ही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरून ज्या पद्धतीने उत्पादनांची खरेदी करता, त्याच पद्धतीने तुम्ही पतंजलीच्या संकेतस्थळावरून खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. पतंजलीने आपल्या ग्राहकांसाठी एक अधिकृत संकेतस्थळ लॉन्च केले आहे. या संकेतस्थळावर जाऊन कोणतीही व्यक्ती हव्या त्या उत्पादनाची खरेदी करू शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ग्राहक संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून पतंजलीचा साबण, टुथपेस्ट, पीठ, तूप, हर्बल ज्यूस यासारखी हजारो उत्पादने खरेदी करता येतील. ग्रामी भाग तसेच छोट्या शहरांतही ही ऑनलाईन खरेदीची सुविधा असेल, असे पतंजलीने सांगितले आहे.
पतंजलीची उत्पादने ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. पंजाब नॅशनलबँक पतंजली क्रेडिट कार्ड किंवा आरबीएल बँक डेबिट कार्डच्या मदतीने तुम्ही या 10 टक्के कॅशबकचा फायदाही मिळवू शकता. काही उत्पादनांवर तर डिलिव्हरी चार्जेसही नाहीत. त्यामुळे तुम्हाला पतंजलीचे कोणतेही उत्पादन खरेदी करायचे असेल तर patanjaliayurved.net या संकेतस्थळाला भेट द्यावी. इथे तुम्हाला पतंजलीच्या मिठाईपासून ते टुथपेस्टपर्यंत सगळं काही खरेदी करता येईल. या संकेतस्थळावर आयुर्वेदिक औषधंदेखील ऑर्डर करण्याची सुविधा आहे.
>>>>> सर्वात अगोदर तुम्हाला https://www.patanjaliayurved.net या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
>>>>> त्यानंतर तुम्हाला संकेतस्थळावर लॉगीन करायचे आहे. त्यासाठी नाव, पत्ता इत्यादी माहिती तुम्हाला भरावी लागेल.
>>>>> त्यानंतर तुम्हाला हवे असलेले उत्पादन निडून त्याला कार्टमध्ये अॅड करायचे.
>>>>> त्यानंतर ऑर्डर या ऑप्शनवर जाऊन अॅड्रेसवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट मोड निवडून ऑर्डर कन्फर्म करावी.
>>>>> पुढच्या काही दिवसात तुम्हाला उत्पादन घरी आणून दिले जाईल.