चालू आर्थिक वर्षात खताच्या सबसिडीमध्ये होणार मोठा बदल; रशिया आणि युक्रेन युद्धाचा थेट शेतीवर परिणाम

| Updated on: Mar 13, 2022 | 6:08 PM

पुढील 2-3 महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमती उतरण्याची अपेक्षा व्यक्त करत आहोत. मात्र सध्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे खत अनुदानामध्ये चालू आर्थिक वर्षात सरकारच्या अर्थसंकल्पात कोणताही बदल होणार नाही, कारण खताच्या अनुदानामध्ये सुमारे 10,000 कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे

चालू आर्थिक वर्षात खताच्या सबसिडीमध्ये होणार मोठा बदल; रशिया आणि युक्रेन युद्धाचा थेट शेतीवर परिणाम
रासायनिक खत
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबईः रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war) चालू आर्थिक वर्षात सरकारच्या खतच्या अनुदानातील (Fertilizer grant) बिलामध्ये सुमारे 10,000 कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र कर महसूल वाढला असल्यामुळे, वित्तीय तूट (financial break) अंदाजे 6.9 टक्क्याच्या जवळपास राहणार आहे. अमेरिका आणि ओपेकच्या सदस्य असलेल्या देशांकडून कच्चा तेलाचे उत्पादन वाढवल्यामुळे येत्या 2-3 महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमतीही कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चालू आर्थिक वर्षात खत अनुदानामध्ये 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, तर पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार (BE) अनुदान 1.05 रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

कच्चा तेलाच्या किंमती उतरणार ?

कच्चा तेल्याच्या किंमती वाढतील की कमी होतील याबाबत एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही पुढील 2-3 महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमती उतरण्याची अपेक्षा व्यक्त करत आहोत. मात्र सध्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे खत अनुदानामध्ये चालू आर्थिक वर्षात सरकारच्या अर्थसंकल्पात कोणताही बदल होणार नाही, कारण खताच्या अनुदानामध्ये सुमारे 10,000 कोटी रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

युरियाच्या देशांतर्गत किंमती वाढणार

शेतकऱ्यांकडून होणाऱ्या पेरणी हंगाम आणि त्यांना लागणाऱ्या खताविषयी अधिकाऱ्यांनी माहिती सांगताना म्हणाले की, पेरणीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांकडे खतांचा साठा होणे आवश्यक आहे, मात्र आयात करताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पोटॅशच्या किंमीत खाली येतील म्हणून कोणीही शेतकरी थांबणार नाही. तसेच नैसर्गिक वायूच्या सध्या किंमती वाढल्या आहेत, त्यामुळे देशातंर्गत युरियाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तसेच या अनुदानात ही वाढ झाली असली तरीही सुधारित अंदाजानुसार चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 6.9 टक्क्यांच्या जवळपास राहणार आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा तिसरा आठवडा

रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात सुरु असलेल्या युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले असले तरी या दोन्ही देशात होत असलेल्या युद्धाचा फटका हा रशियालाही बसला आहे. या युद्धात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्धवस्त झाली आहेत. कीवसारख्या राजधानीच्या शहराचा मोठा विध्वंस या युद्धात झाला आहे. रशियाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी युक्रेनमधील अनेक नागरिकांनी आपला देश सोडून दुसऱ्या देशात आसरा घेतला आहे.

संबंधित बातम्या

आर्थिक सुधारणेचा वेग चांगला मात्र कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे धक्का बसणार: आशिमा गोयल यांचे मत; त्या म्हणतात आर्थिक दर चांगला पण…

पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव

तुम्हालाही ऑनलाईन कर्ज हवे आहे? मग ही फिनटेक कंपन्यांची ‘डिजिटल दादागिरी’ एकदा बघाच