बजाज फिनसर्व्ह Q4 अहवाल : नफा 37%, कंपनीचे नफा 18,861 कोटींवर; लाभांश जाहीर

कंपनीच्या नफ्यात सर्वोत्तम वाढ नोंदविली गेली. बजाज फिनसर्व्हला चालू तिमाहीच्या नफ्यात 37.5 टक्क्यांच्या वाढीसह 1336.1 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गैर-वित्तीय फायनान्स (Non Banking Finance) कंपनीचे एकूण उत्पन्न 22 टक्क्यांच्या वाढीसह 18,861 रुपयांवर पोहोचले आहे.

बजाज फिनसर्व्ह Q4 अहवाल : नफा 37%, कंपनीचे नफा 18,861 कोटींवर; लाभांश जाहीर
आर्सेलर मित्तलची बक्कळ कमाई
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 8:42 PM

नवी दिल्ली : बजाज फिनसर्व्हने (Bajaj Finserv) आज (गुरुवारी) चौथ्या आर्थिक तिमाहीचे आकडेवारी घोषित केले आहे. कंपनीची सर्वोत्तम कामगिरी समोर आली आहे. कंपनीच्या नफ्यात सर्वोत्तम वाढ नोंदविली गेली. बजाज फिनसर्व्हला चालू तिमाहीच्या नफ्यात 37.5 टक्क्यांच्या वाढीसह 1336.1 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गैर-वित्तीय फायनान्स (Non Banking Finance) कंपनीचे एकूण उत्पन्न 22 टक्क्यांच्या वाढीसह 18,861 रुपयांवर पोहोचले आहे. बजाज फिनसर्व्हच्या शेअर धारकांनी प्रति शेअर 4 रुपयांचा लाभांश(डिव्हिडंड) देण्याची शिफारस केली आहे. बजाज फिनसर्व्हच्या आर्थिक वाढीत विमा व्यवहारांचे योगदान मोठे मानले जात आहे. बजाज फिनसर्व्हच्या लाईफ इन्श्युरन्सचा प्रीमियम 27 टक्क्यांच्या वाढीसह 5718.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जनरल इन्श्युरन्सचे प्रीमियम (Insurance premium) वार्षिक आधारावर 18.4 टक्क्यांची वाढ झाली आहे.

युक्रेन-रशिया विवाद फटका

बजाज फिनसर्व्हच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहित व्यावसायिक पातळीवर सुधारणेचं चित्र दिसून आलं. युक्रेन-रशिया विवादामुळं तेजी-घसरण चित्र दिसून आलं. पुरवठा साखळीच्या अडचणीमुळे ऑटोमोबाईल्स विक्रीत घट झाली. त्यामुळे जनरल इन्श्युरन्स वर मोठा परिणाम झाला. बजाज अलियांझ जनरल इन्श्युरन्स कंपनीच्या चौथ्या तिमाहीचा नफा 248 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षात चौथ्या तिमाहित कंपनीचा नफा 278 कोटी रुपये होता.

बजाज फिनसर्व्ह आर्थिक तिमाही वैशिष्ट्ये

· कंपनीचे उत्पन्न 22 टक्क्यांच्या वाढीसह 18861 रुपयांवर

· प्रति शेअर 4 रुपये लाभांशाची घोषणा

· लाईफ इन्श्युरन्स प्रीमियम 27 टक्क्यांच्या वाढीसह 5718.7 कोटीवर

· जनरल इन्श्युरन्स प्रीमियम 18 टक्क्यांची वाढ

बजाज फिनसर्व्ह : कर्ज वितरण ते संपत्ती व्यवस्थापन

बजाज फिनसर्व्ह लिमिटेड ही भारतातील आघाडीची बिगर बँकिंग वित्तीय सेवा कंपनी मानली जाते. बजाज फिनसर्व्हचे मुख्यालय भारतातील पुण्यात आहे. कर्ज देणे, मालमत्ता व्यवस्थापन, संपत्ती व्यवस्थापन आणि विमा हे कंपनीचे कार्यक्षेत्र मानले जातात. कंपनीचे कार्यक्षेत्र 1409 ठिकाणी असून 20154 हून अधिक कर्मचारी नियुक्त आहेत. बजाज फिनसर्व्हचे ग्राहक वित्त व्यवसाय, लाईफ इन्श्युरन्स आणि जनरल इन्श्युरन्स यामध्ये कार्यरत आहे. बजाज फिनसर्व्ह आर्थिक सेवा व्यतिरिक्त उर्जा निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे.

इतर बातम्या

Petrol Diesel Price : इंधन करावरून केंद्र, राज्य आमने-सामने; महाराष्ट्र सरकारची दुप्पट वसुली, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडले कराचे संपूर्ण गणित

Godrej Properties | गोदरेज प्रॉपर्टीजची नागपुरात जमीन खरेदी, विमानतळालगत 58 एकर जागा प्लाट्ससाठी