Bank Holiday : 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत, बँकांना किती दिवस सुट्या? एका क्लिकवर जाणून घ्या

Bank holiday for Dhanteras-Diwali : दिवाळ सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असं म्हटल्या जाते. दिवाळी हा आनंदोत्सव आहे. या काळात बँकांनाही सुट्टी असते. 18 ते 23 ऑक्टोबरदरम्यान कुठे आणि किती दिवस बँका असतील बंद, जाणून घ्या.

Bank Holiday : 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंत, बँकांना किती दिवस सुट्या? एका क्लिकवर जाणून घ्या
दिवाळी बँक सुट्या
| Updated on: Oct 17, 2025 | 2:15 PM

Bank Holiday : दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. दीपोत्सवासह आनंदोत्सव साजरा होईल. शाळांना सुट्टी असेल. बँकांचे शटर सुद्धा काही ठिकाणी बंद असेल. जर तुम्हाला या आठवड्यात बँकेसंबंधी काही महत्त्वाचे काम करायचे असेल तर पहिल्यांदा ही सुट्टीची यादी पाहा. 18 ते 23 ऑक्टोबरदरम्यान कुठे आणि किती दिवस बँका असतील बंद, जाणून घ्या.

दिवाळी 2025 मध्ये केव्हा केव्हा बँका राहतील बंद?

उद्यापासून 18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत दिपावली पर्व आहे. 18 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. तर 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे. या दरम्यान देशातील विविध शहरातील बँकांना सुट्टी असेल. या काळात शहरातील बँकांचे शटर डाऊन असेल. बँकांचे कामकाज होणार नाही.

18 ऑक्टोबर धनत्रयोदशी : धनत्रयोदशी रोजी केवळ गुवाहाटीमध्ये बँका बंद असतील. याशिवाय दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, कोलकत्ता, जयपूरसह इतर शहरातील बँका सुरू राहतील.

19 ऑक्टोबर : रविवार असल्याने या दिवशी सर्वच राज्यातील बँका बंद असतील.

20 ऑक्टोबर : या दिवशी नवी दिल्ली, कोलकत्ता, चेन्नईसह अनेक शहरातील बँका बंद असतील. तर मुंबई, नागपूर, श्रीनगरसह काही शहरातील बँकांचे कामकाज सुरू राहील.

21 ऑक्टोबर : लक्ष्मी पुजन असले तरी भोपाळ, भुवनेश्वर, मुंबई, नागपूरसह काही ठिकाणच्या बँका सुरू असतील.

22 ऑक्टोबर : मुंबई, नागपूरसह अनेक शहरातील बँका बंद असतील.

23 ऑक्टोबर : भाऊबीजेच्या दिवशी काही शहरातील बँका सुरू असतील. तर काही ठिकाणी बँका बंद असतील.

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल. त्यामुळे व्यवहारासंबंधीचे कोणतेही काम अडणार नाही. मात्र बँकिंगसंबंधीची काही कामे मात्र या काळात होण्यास विलंब होईल. RBI प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीलाच बँकेसंबंधीच्या सुट्यांची यादी जाहीर करते. यामध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्यांचा समावेश असतो. अर्थात सर्वच राज्यात एकाच दिवशी सुट्टी नसेल. काही राज्यात एकाच दिवशी बँका बंद असतील. तरीही कामांचा खोळंबा टाळण्यासाठी सुट्यांच्या यादीवर एक नजर टाका.