Bank Holidays : जूनमध्ये सुट्यांचा मुक्काम; या दिवशी बँकांना राहिल ताळे

Bank Holidays In June 2024 : जून महिना सुरु होईल. या महिन्यात आता शाळा प्रवेशाची आणि इतर घाई असेल. त्यातच बँकेसंबंधी काही कामे असतील तर सुट्यांचा वार, दिवस टाळून कामे करावे लागतील. 1 जून 2024 रोजी लोकसभेच्या मतदानासाठी काही राज्यात सुट्टी आहे.

Bank Holidays : जूनमध्ये सुट्यांचा मुक्काम; या दिवशी बँकांना राहिल ताळे
जून महिन्यात या दिवशी बँकांना सुट्या
Follow us
| Updated on: May 29, 2024 | 3:11 PM

मे महिना संपून आता जून महिना सुरु होईल. या महिन्यात शाळा प्रवेशाची, नवीन वह्या-पुस्तकं, गणवेशाची कोण धांदल उडालेली असेल. तर मान्सून दाखल होत असल्याने शेतकऱ्यांमागे मोठी लगबग असेल. अशातच जून महिन्यातील या दिवशी बँकांना सुट्टी असेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षांतील सुट्यांची एक यादी जाहीर केलेली आहे. त्यानुसार जून महिन्यात एकूण 12 दिवस बँकांना ताळे असेल. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी, 1 तारखेला काही राज्यात लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. त्या भागात बँकांना सुट्टी असेल.

12 दिवस सुट्यांचा मांडव

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार, जून महिन्यात एकूण 12 दिवस कोणतेही कामकाज होणार नाही. अर्थात प्रत्येक राज्यात इतक्या दिवस बँका बंद असतील असे नाही. त्या-त्या राज्यानुसार त्यात उलटफेर दिसून येतो. या काळात शनिवार-रविवार आणि सण-उत्सवामुळे सुट्यांचे सत्र असेल. राज्यातही काही दिवस बँकांना ताळे दिसेल.

हे सुद्धा वाचा

जून 2024 महिन्यातील बँकांच्या सूट्यांची यादी

 • 1 जून रोजी लोकसभा निवडणूक 2024 च्या मतदानासाठी काही राज्यांत सुट्टी
 • 2 जूनला रविवार आहे. त्यादिवशी सर्वच बँकांना ताळे असेल
 • 8 जून रोजी महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँकेचे शटर डाऊन
 • 9 जून रोजी हक्काचा सुट्टीचा दिवस असल्याने बँकेतील कामकाज होणार नाही
 • 16 जून रोजी रविवार, देशभरातील बँका बंद असतील
 • 22 जून रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँकांना ताळे
 • 26 जूनला रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असेल

सणांमुळे या राज्यात बँकांना ताळे

 1. 1 जून रोजी लोकशाहीचा उत्सव, लोकसभा निवडणूक मतदानासाठी सुट्टी
 2. 9 जून रोजी महाराणा प्रताप जयंतीमुळे हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थानमध्ये बँका बंद
 3. 10 जून रोजी श्रीगुरु अर्जुन देवजींच्या हौतात्म्य दिनानिमित्त पंजाबमध्ये बँकांना सुट्टी
 4. 14 जून रोजी ओडिशा राज्यातील बँका बंद असतील
 5. 15 जूनला YMA दिवसानिमित्ताने ओडिशा राज्यातील बँकांमध्ये कामकाज नाही
 6. 17 जून रोजी ईद-उल-अजहा (बकरी ईद), देशभरातील बँका बंद
 7. 21 जून रोजी वटसावित्री पौर्णिमेमुळे बँकांमध्ये कामकाज नाही

ऑनलाईन बँकिंग सेवा सुरु

सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.