AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alert : या सरकारी बँकेचे ग्राहक असाल तर आधी करा हे काम, अन्यथा 17 दिवसांत बंद होईल कार्ड

बँक ऑफ इंडियाने (BOI) आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, 21 एप्रिल 2021 पासून कार्ड शिल्ड अनुप्रयोग (Card Shield Application) कार्य करणार नाही.

Alert : या सरकारी बँकेचे ग्राहक असाल तर आधी करा हे काम, अन्यथा 17 दिवसांत बंद होईल कार्ड
| Edited By: | Updated on: Apr 04, 2021 | 2:54 PM
Share

मुंबई : जर आपण बँक ऑफ इंडियाचे ( Bank of India) डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण 17 दिवसानंतर या सरकारी बँकेची खास सेवा बंद केली जात आहे. बँक ऑफ इंडियाने (BOI) आपल्या ग्राहकांना सांगितले आहे की, 21 एप्रिल 2021 पासून कार्ड शिल्ड अनुप्रयोग (Card Shield Application) कार्य करणार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही यापूर्वी हे अ‍ॅप अद्यतनित केले पाहिजे. आपण हे न केल्यास, या अ‍ॅपद्वारे आपले डेबिट कार्ड नियंत्रित करू शकणार नाही. ट्वीट करुन बँकेने ही माहिती दिली आहे. (banking news bank of india notice for termination of card shield application for debit card)

बँक ऑफ इंडियाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, बँकेने डेबिट कार्ड शिल्ड अॅप्लिकेशन प्रदान केलं आहे. ज्याद्वारे डेबिट कार्ड धारक त्यांच्या डेबिट कार्डवर नियंत्रण ठेवू शकतात. बँकेने डेबिट कार्ड शिल्ड अॅप्लिकेशनला बीओआय मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग अॅप्लिकेशनसह इंटिग्रेट केले आहे. बँकेने ट्वीटमध्ये प्लेस्टोअर आणि अॅपस्टोरवरून बीओआय मोबाइल बँकिंग डाउनलोड करण्यासाठी एक लिंकही दिली आहे. ग्राहक इथून मोबाईलमध्ये बँकेचे मोबाइल बँकिंग अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.

21 एप्रिलपासून डेबिट कार्ड शिल्ड अॅप काम करणार नाही

बँक म्हणाले की, डेबिट कार्ड शिल्ड वापरणार्‍या सर्व डेबिट कार्डधारकांना डेबिट कार्ड सर्व्हिस अ‍ॅपचा लाभ घेण्यासाठी मोबाईल बँकिंग अॅप्लिकेशन किंवा इंटरनेट बँकिंग डाउनलोड करण्याची विनंती केली जाते. कार्ड शिल्ड अॅप 21 एप्रिल 2021 पासून उपलब्ध होणार नाही.

BOI-Card-Shield-App-1-300x169

कार्ड शिल्ड अॅपचा काय फायदा

कार्ड शिल्डखाली ग्राहक आपल्या कार्डवर नियंत्रण ठेवू शकतो. डेबिट कार्ड कधी, कुठे, कसे वापरायचे, ग्राहक या अॅप्लिकेशनच्या मदतीने निर्णय घेऊ शकतात. जर आपले कार्ड हरवले तर या अॅप्लिकेशनच्या मदतीने कार्ड बंद केले जाऊ शकते. ऑनलाईन व्यवहार झाल्यावर तुम्हाला याबद्दल सूचना मिळेल.

इथे मिळेल माहिती

अधिक माहितीसाठी तुम्ही बँक ऑफ इंडियाच्या www.bankofindia.con.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता. तुम्ही टोल फ्री क्रमांकावर 1800 220 229/ 1800 103 1906 वर संपर्क साधू शकता. (banking news bank of india notice for termination of card shield application for debit card)

संबंधित बातम्या – 

या सरकारी योजनेमध्ये करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्यावा मिळतील 3000 रुपये, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

स्वस्तात खरेदी करा Mi, सॅमसंग आणि LG धमाकेदार स्मार्ट TV, वाचा काय आहे किंमत?

बोनससह लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी, रोज करा फक्त 189 रुपयांची बचत

(banking news bank of india notice for termination of card shield application for debit card)

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट