AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीतूनच महिला झाली करोडपती; झोपेमुळे लागली लॉटरी, तुम्हाला हवी अशी कमाईची संधी?

बंगळुरूत एका महिलेने सुख निद्रेतून जोरदार कमाई केली आहे. तुम्हाला जरा चमत्कारीकच वाटेल पण हे खरे आहे. या स्टार्टअपच्या मदतीने या महिलेने ही कमाई केली आहे. या महिलेने झोप काढून कशी कमाई केली याचाच प्रश्न अनेकांना पडला आहे. या महिलेचे नाव साईश्वरी आहे.

एका रात्रीतूनच महिला झाली करोडपती; झोपेमुळे लागली लॉटरी, तुम्हाला हवी अशी कमाईची संधी?
झोप काढून केली कमाई
| Updated on: Sep 24, 2024 | 10:50 AM
Share

साईश्वरी या महिलेने कमाल केली आहे. इथं लोक रात्रंदिवस काबाडकष्ट करुन पै पै जोडतात. पण या महिलेने अशी कुठलीही तसदी घेतली नाही. तिने एका आयडियातून ही रक्कम कमावली आहे. झोप काढून तिने थोडे थोडके नाही तर 9 लाखांची कमाई केली आहे. तिने एका स्पर्धेत भाग घेऊन ही कमाई केली आहे. या महिलेने झोप काढून कशी कमाई केली याचाच प्रश्न अनेकांना पडला आहे. काय आहे ही स्पर्धा, तुम्हाला पण मिळेल का त्यात सहभागी होण्याची संधी आणि कमाईचा मौका?

झोपण्याच्या स्पर्धेत ठरली विजेती

साईश्वरी या महिलेने झोपण्याची स्पर्धा जिंकली आहे. बंगळूरु येथील स्टार्टअप वेकफिटच्या (Wakefit) स्लीप इंटर्नशीप प्रोग्राममध्ये तीने स्लीप चॅम्पियन हा किताब जिंकला आहे. या कार्यक्रमात तिच्यासह 12 ‘स्लीप इंटर्न’ सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत सुखाची झोप येणे आणि घेणे महत्वाचे आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येक रात्री कमीत कमी 8 ते 9 तासांची झोप घेणे बंधनकारक आहे. तसेच निद्रा तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर झोपेसंदर्भातील इतर क्रिया करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच तो खरंच झोपला की नाही यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येते.

निद्रा सल्लागाराच्या नेतृत्वात कार्यशाळा

निद्रा सल्लागाराच्या नेतृत्वात स्पर्धकाला झोपेचे प्रशिक्षण देण्यात येते. यामध्ये स्पर्धकाला दिवसा 20 मिनिटांची डुलकी घ्याव लागते. प्रत्येक स्पर्धकावर येथे लक्ष ठेवण्यात येते. त्याला नरम आणि मुलायम उशी आणि स्लीप ट्रॅकर देण्यात येतो. स्पर्धकाची झोपण्याची सवय सुधारावी आणि स्लीप चॅम्पियन हा किताब नावावर असावा यासाठी त्याची नियमित कार्यशाळा घेण्यात येते.

10 लाख लोकांनी केली नोंदणी

या इंटर्नशिप प्रोगाममध्ये 10 लाखांहून लोकांनी नोंदणी केली. या स्पर्धेचे हे तिसरे पर्व आहे. त्यासाठी देशभरातून जोरदार प्रतिसाद मिळाला. या झोपण्याच्या स्पर्धेसाठी दहा लाखांहून अधिक लोकांनी नाव नोंदणी केली होती. कंपनीच्या संकेतस्थळावर त्याची माहिती मिळू शकते. या कार्यक्रमात निद्राधीश हा किताब अर्थात साईश्वरीने पटकावला. या स्पर्धेतील 51 स्पर्धकांना रोजगार पण मिळाला.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.