Warren Buffett : 94 वर्षांचे वय, 14 लाख कोटींची संपत्ती, आता अब्जाधिशाच्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या
Berkshire Hathaway Warren Buffett : दिग्गज गुंतवणूकदार आणि बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता ते 94 वर्षांचे वय आहे, त्यांच्याकडे 14 लाख कोटींची संपत्ती आहे. त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

बर्कशायर हॅथवेचे 94 वर्षांचे अध्यक्ष आणि सीईओ, जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकतीच शेअरधारकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी मोठी घोषणा केली. या घोषणेमुळे 40,000 हून अधिक उपस्थित गुंतवणूकदारांनाच नाही तर जगाला धक्का दिला. त्यांच्या या निर्णयानंतर उपस्थितांनी त्याचे स्वागत केले. बफे यांनी निवृत्ती जाहीर केली आणि त्यांच्या उत्तराधिकार्याची घोषणा केली.
कोण आहे नवीन CEO?
कंपनीचे सध्याचे उपाध्यक्ष ग्रेग एबेल हे या वर्षाच्या अखेरीस कंपनीचे सीईओ होतील. त्यांच्याकडे हे पद येईल असे 2021 मध्येच स्पष्ट झाले होते. एबेल हे सध्या बर्कशायरच्या बिगर विमा व्यवसायाचे नेतृत्व करत आहे. आता कंपनीचे सर्व ऑपरेशन्स, विमा आणि गुंतवणूक धोरणांची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
बर्कशायर हॅथवेकडे संपत्ती किती?
बर्कशायर हॅथवेने नुकताच त्यांचा तिमाही अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार, कंपनीकडे 347.7 अब्ज डॉलरची नगद रक्कम आहे. तर कंपनीने गेल्या दहा तिमाहीत सर्वाधिक शेअरची पण विक्री केली आहे. कंपनीने ॲप्पल आणि बँक ऑफ अमेरिका यामधील त्यांची गुंतवणूक कमी केली आहे.
ग्रेग एबेल यांच्या नियुक्तीचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे. त्यांच्या नियुक्तीकडे सकारात्मकदृष्टीने पाहण्यात येत आहे. त्यांना बफेटची प्रतिष्ठा आणि प्रभावाविना काम करावे लागेल. ही कंपनी आणि एबेलसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. बफेट यांची सेवानिवृत्ती म्हणजे एका युगाचा अंत आहे. पण त्यांचे मार्गदर्शन, धोरणं यांचा बर्कशायर कंपनीला मोठा फायदा होईल. भविष्यातही कंपनीवर त्यांचा प्रभाव कायम राहिल, असे सांगण्यात येते.
बफे, शेअरचे करणार दान
बर्कशायर हॅथवेचे बाजार मूल्य 1.16 ट्रिलियन डॉलर इतके आहे. आता वॉरेन बफे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. तरीही ते या कंपनीचे शेअरधारक म्हणून कायम राहतील. पण वर्षाच्या अखेरीस ग्रेग एबेल यांच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार येतील. बफे आता कंपनीचे सल्लागार असतील. याशिवाय बफे हे त्यांच्याकडील शेअरची विक्री करणार नाहीत तर ते दान करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
