प्रचंड महागाई, मुलांच्या शिक्षणाचा आणि भविष्यातील लग्नाच्या खर्चाची चिंता सतावतेय? ‘या’ मार्गाचा अवलंब करा

| Updated on: Jul 24, 2021 | 8:29 PM

मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नाच्या खर्चासाठी म्यूचुअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची ठरु शकते.

प्रचंड महागाई, मुलांच्या शिक्षणाचा आणि भविष्यातील लग्नाच्या खर्चाची चिंता सतावतेय? या मार्गाचा अवलंब करा
mutual funds
Follow us on

मुंबई : दिवसेंदिवस महागाई प्रचंड डोकंवर काढत आहे. जीवनाश्मक वस्तूंच्या किंमती तर अक्षरश: गगनाला भिडताना दिसत आहेत. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता सतावत आहे. आपल्याकडील संपूर्ण पैसे खर्च झाले तर मुलांच्या पुढील भविष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी पैसे कसे गोळा करायचे, ऐनवेळी पैसे कुठून आणायचे? असे अनेक प्रश्न पालकांच्या मनाला भेडसावत आहेत. पण असा विचार करणाऱ्या पालकांसाठी आम्ही एक चांगला पर्यायी मार्ग सूचवू इच्छितो. मुलांच्या पुढील शिक्षणाच्या खर्चासाठी म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणं हा एक चांगला पर्याय आहे.

मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नाच्या खर्चासाठी म्यूचुअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची ठरु शकते. कारण इतर स्किस्मच्या तुलनेने म्यूचुअल फंडमधून चांगले रिटर्न्स मिळतात. अनेक कंपन्यांचे याबाबतचे वेगवेगळे प्लॅन आहेत. पण आम्ही तुम्हाला चार अशा चांगल्या म्यूचुअल फंडची माहिती देणार आहोत ज्यातून तुम्हाला चांगले पैसे देखील परत मिळतील. तुमचे पैसे जास्त दिवस आणि सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच चांगल्या मोबदल्यासाठी हायब्रिड फंड किंवा बॅलेन्स म्यूचुअल फंडमधील गुंतवणुकीचा चांगला उपाय आहे. याशिवाय गिफ्ट फंड डेट किंवा इक्विटी सिक्योरिटीमध्येही गुंतवणूक करता येऊ शकते. दरम्यान चार चांगले फायदेशीर फंड कोणते याची थोडक्यात माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1) एलआयसी एमएफ चिल्ड्रन फंड

एलआयसीची हा गिफ्ट फंड आहे. या गिफ्ट फंडने गेल्यावर्षीच्या तुलनेत 33.91 टक्क्याचे रिटर्न्स दिले आहेत. विशेष म्हणजे या फंडच्या स्थापनेपासून दरवर्षी 10.50 टक्क्याचे रिटर्न्स मिळाले आहेत. याच्या पहिल्या पाच होल्डिंग्जमध्ये भारत सरकार, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. फंडाचे खर्चाचे प्रमाण 1.41 टक्के आहे, जे इतर बॅलेन्स हायब्रिड फंडच्या तुलनेने जास्त आहे.

2) अ‍ॅक्सिस चिल्ड्रन्स गिफ्ट फंड

हे एक सॉल्यूशेन ऑरिएंटेड चिल्ड्रन फंड आहे. यातून तुम्हाला जेव्हा हवे तेव्हा पैसे काढता येऊ शकतात. या फंडचा मार्केट कॅप हा 607.91 कोटी इतका आहे. यामध्ये जर 365 दिवसांची स्कीम रिडीम केली तर तु्म्हाला 3 टक्के बोनस मिळेल. 366 ते 730 दिवसांदरम्यान रिडीमवर दोन टक्के तर 731 ते 1095 दिवसांदरम्यान एक टक्के बोनस मिळेल.

3) एचडीएफसी चिल्ड्रन गिफ्ट फंड

हा एक डायरेक्ट प्लान आहे. या म्यूचुअल फंडमध्ये एका वर्षात तब्बल 48.06 टक्के रिटर्न मिळतात. मुलांच्या भविष्याचा विचार करुन गुंतवणूक करत असाल तर ही स्किमदेखील गुंतवणुकीसाठी चांगली आहे.

4) एसबीआय मॅग्नेम चिल्ड्रन बेनिफिट फंड

हा एक हायब्रिड म्यूचुअल फंड आहे. याचे भारत सरकार, मुथूट फायनान्स लिमिटेड, लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रिज लिमिटेड, पावरग्रिड इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट ट्रस्ट आणि कॅथोलिक सीरियन बँक लिमिटेड फंड असे सहा टॉप होल्डिंग्स आहेत.

हेही वाचा :

प्लस मेंबर्ससाठी Flipkart Sale; iPhone 12 सह ‘या’ स्मार्टफोन्सवर तगडा डिस्काऊंट

तुम्ही PPF खात्यातर्फे बचत करता? एसबीआयने सांगितले, कधी काढू शकता तुमचे पैसे?