AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खात्यात किमान बॅलन्स न ठेवल्याबद्दल ‘या’ सरकारी बँकेनं ग्राहकांकडून वसूल केले इतके कोटी, तुम्हीही व्हा सावध

गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेने असे कोणतेही शुल्क आकारले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत बँकेने असे शुल्क म्हणून अनुक्रमे 48.11 कोटी आणि 86.11 कोटी रुपये वसूल केले.

खात्यात किमान बॅलन्स न ठेवल्याबद्दल 'या' सरकारी बँकेनं ग्राहकांकडून वसूल केले इतके कोटी, तुम्हीही व्हा सावध
punjab national bank nps account
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Sep 21, 2021 | 10:40 AM
Share

नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान बँक खात्यांमध्ये किमान शिल्लक न ठेवणाऱ्या ग्राहकांकडून फी म्हणून 170 कोटी रुपये गोळा केलेत. माहितीच्या अधिकाराअंतर्गत (आरटीआय) मागितलेल्या माहितीवर बँकेने ही माहिती दिली. 2019-20 या आर्थिक वर्षात पीएनबीने या शुल्काद्वारे 286.24 कोटी रुपये वसूल केले होते. बँक आर्थिक वर्षात तिमाही आधारावर असे शुल्क आकारते.

गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकेने त्रैमासिक सरासरी शिल्लक (क्यूएबी) शुल्क म्हणून 35.46 कोटी रुपये वसूल केले. हे शुल्क बचत खाते आणि चालू खाते दोन्हीवर आकारण्यात आले. गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेने असे कोणतेही शुल्क आकारले नाही. तिसऱ्या आणि चौथ्या तिमाहीत बँकेने असे शुल्क म्हणून अनुक्रमे 48.11 कोटी आणि 86.11 कोटी रुपये वसूल केले.

एटीएम व्यवहार शुल्क म्हणून 74.28 कोटी जमा झाले

मध्य प्रदेशचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी आरटीआय अंतर्गत बँकेकडून याबाबत माहिती मागितली होती. याशिवाय बँकेने गेल्या आर्थिक वर्षात एटीएम शुल्काच्या स्वरूपात 74.28 कोटी रुपये गोळा केले, तर 2019-20 मध्ये बँकेने या शुल्कापासून 114.08 कोटी रुपये जमा केले. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारच्या निर्देशांचे पालन करून, पीएनबीने एटीएम शुल्क माफ केले होते. दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना बँकेने म्हटले आहे की, 30 जून 2021 पर्यंत 4,27,59,597 खाती निष्क्रिय होती. त्याच वेळी 13,37,48,857 खाती सक्रिय होती.

ATM मधून पैसे काढण्यासाठी नियम बदलले

आरबीआयने 1 ऑगस्ट 2021 पासून एटीएममधून आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपये केले.

1 ऑक्टोबरपर्यंत हे काम करा

ई-ओबीसी आणि ई-यूएनआयची जुनी चेकबुक 1 ऑक्टोबरपासून चालणार नाहीत. ग्राहकांना सांगण्यात आले आहे की, ज्यांच्याकडे ओबीसी आणि यूएनआय बँकांची जुनी धनादेश पुस्तके आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्यांची नवीन पुस्तके घ्यावीत, अन्यथा जुनी धनादेश पुस्तके 1 ऑक्टोबरपासून निरुपयोगी होतील.

ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया गेल्या वर्षी 1 एप्रिल 2020 रोजी पीएनबीमध्ये विलीन झाली. आता UBI आणि OBC चे सर्व काम PNB अंतर्गत केले जात आहे. त्यानुसार IFSC कोड आणि MICR देखील बदलले जात आहेत. दोन्ही बँकांचे कोड आता PNB च्या कोडसह चालतील. यापूर्वी PNB ने UBI आणि OBC साठी नवीन IFSC कोड आणि MICR जारी केले होते.

संबंधित बातम्या

Gold/Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत

बँक ऑफ बडोदाने लाँच केले हे विशेष डेबिट कार्ड; टोल, पार्किंग किंवा बस-ट्रेनचे तिकिटाचे पेमेंट सहज करता येणार

Beware of Government Bank recovering crores from customers for not keeping minimum balance in the account

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?