1 मार्चपासून मोठा बदल, रेल्वे तिकीट बुकिंग, युपीआय पेमेंट, एलपीजी सिलेंडरचा भाव, काय बदल होणार?

1 March Rules Change: 1 मार्चपासून गॅस सिलेंडरपासून ते व्हॉट्सॲप, युपीआय पेमेंट, LPG सिलेंडर ते बँकेचे किमान शिल्लक याविषयीचे अनेक नियम बदलण्यात येत आहे. त्याचा सर्वसामान्यांवर परिणाम होणार आहे. काय काय होणार आहे बदल?

1 मार्चपासून मोठा बदल, रेल्वे तिकीट बुकिंग, युपीआय पेमेंट, एलपीजी सिलेंडरचा भाव, काय बदल होणार?
अनेक नियमात मोठा बदल
Image Credit source: गुगल
| Updated on: Feb 28, 2026 | 10:31 AM

1 March Rules Change: 1 मार्चपासून रेल्वे आरक्षणापासून ते UPI व्यवहाराशी संबंधित नियमात मोठा बदल होत आहे. LPG गॅस सिलेंडर, बँक ठेव, व्हॉट्सॲप,टेलिग्रामशी संबंधित नियम लागू होतील. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर आणि घर खर्चावर पडणार आहे. या 1 मार्चपासून स्वयंपाक घरापासून ते मोबाईल फोनविषयी अनेक बदल दिसतील. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगचा पण समावेश आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल दिसून येऊ शकतो. काय काय होणार बदल, जाणून घ्या.

रेल्वे तिकीट बुकिंगसंबंधी बदल

1 मार्चपासून रेल्वेकडून तिकीट बुकिंग सिस्टिममध्ये मोठा बदल होणार आहे. जुन्या ॲपमधून जनरल तिकीट वा प्लॅटफॉर्म तिकीट सुविधा बंद होईल. प्रत्येक दिवशी लाखो यात्री मोबाईल फोनद्वारे तिकीट बुक करत होते. पण आता त्यांना 1 मार्चपासून ही सुविधा बंद होईल. 1 मार्चपासून जुनी UTS ॲप बंद होईल. आता Rail One App मदतीने जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट याशिवाय तिकीट आरक्षण करता येईल.

1 मार्चपासून बँक, UPI चा नवीन नियम

डिजिटल पेमेंट सहज होण्यासाठी 1 मार्चपासून अधिक सुरक्षा देण्यात येईल. UPI च्या माध्यमातून मोठी रक्कम पाठवताना अजून एक दोन टप्पे पार करावे लागतील. 1 मार्चपासून UPI PIN सह बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन, एक्सट्रा ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल. 1 मार्चपासून Average Monthly Balance महिन्याच्या सरासरीवर गृहीत धरण्यात येईल. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होईल.

1 मार्चपासून सोशल मीडियाबाबत बदल

1 मार्चपासून व्हॉट्सॲप, टेलिग्राम सारख्या ॲपमध्ये बदल दिसून येईल. मॅसेजिंग ॲप्सवर नवीन सिम बायडिंगचा नियम लागू होईल. या नियमातंर्गत WhatsApp, Telegram सारखे ॲप सक्रिय सिम कार्डशी जोडलेली असतील. जर फोनमध्ये सिम कार्ड नसेल तर हे ॲप्स चालणार नाही.

गॅसच्या किंमतीत होईल वाढ?

1 मार्च, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमती समोर येतात. इंधन कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सुधारणा होते. दर महिन्याला या किंमतीत बदल होतो. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत चढउतार होताना दिसतो.

Follow Us