AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खंडोबाच्या मंदिरात आक्रित घडलं… पांडवकालीन शिवलिंग गायब, मध्यरात्रीच… पुण्यात खळबळ

पुण्यातील मुळशी तालुक्यात खंडोबा मंदिरातून पांडवकालीन शिवलिंग चोरीला गेल्याने खळबळ उडाली. अज्ञात चोरट्याने मंदिराची तोडफोड केली होती. मात्र, ग्रामस्थ आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे हे शिवलिंग डोंगर परिसरात सापडले. या घटनेने दुर्गम भागातील ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

खंडोबाच्या मंदिरात आक्रित घडलं... पांडवकालीन शिवलिंग गायब, मध्यरात्रीच... पुण्यात खळबळ
पुण्याजवळ मंदिरातच झाली चोरी
| Updated on: Feb 28, 2026 | 12:25 PM
Share

राज्यात गुन्ह्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. चोरी, दरोड्याच्या घटना आपण ऐकत असतोच. पण पुण्याजवळ नुकताच असा प्रकार घडला ते ऐकून सगळेच हादरले. एका अज्ञात चोरामुळे मंदिरातील देवांनांही धक्का बसला. अज्ञात इसमाने चक्क मंदिरातील शिवलिंगच चोरी केल्याचा भयाक प्रकार समोर आला आणि गावकरी हैराण झाले. पांडवकालीन शिवलिंगाची अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून चोरी करण्यात आली होती. मात्र सतर्क ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने त्या शिवलिंगाचा शोध घेण्यात यश मिळालं. या संपूर्ण घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे.

पुण्यातील मुळशी तालुक्यातील मुलखेड-घोटावडे परिसरात ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं होतं. दुर्गम डोंगरावर वसलेल्या खंडोबा मंदिरातील पांडवकालीन शिवलिंगाची, अज्ञात व्यक्तीने तोडफोड केली आणि चोरी केल्याचा प्रकार उघड झाला. मात्र ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने हे शिवलिंग मंदिर परिसरातच सापडलं.

नेमकं काय घडलं? 

पुण्यातील मुळशी तालुक्यातील मुलखेड गावात हा प्रकार घडला. तेथे सुमारे 1700 ते 1800 मीटर उंचीवर वसलेलं हे खंडोबा मंदिर आहे. जंगलातील खडतर रस्ता पार केल्यानंतरच या मंदिरात पोहोचता येतं. आणि याच मंदिरात पांडवकालीन शिवलिंग स्थापित आहे. मात्र एका अज्ञात चोरट्याने मंगळवारी रात्री या शिवलिंगाची तोडफोड केली आणि ते चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही घटना घडून तब्बल तीन दिवस झाले, तरीही ग्रामस्थांना याची कल्पनाही नव्हती. ते शिवलिंग जिथे होतं, त्या ठिकाणी दगडी कुंडी ठेवण्यात आली होती. त्यामुळे शिवलिंग चोरीला गेलंय हे नागरिकांना समजलंही नाही.

मात्र जेव्हा हा प्रकार लक्षात आला, तेव्हा गावात एकच खळबळ उडाली. शिवलिंगद चोरीला गेल्या सगळेच हादरले. त्यानंतर ग्रामस्थ एकत्र आले आणि त्यांनी शुक्रवारी पौड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. यामागे माथेफिरू व्यक्ती असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.

अखेर सापडलं शिवलिंग

ग्रामस्थांची तक्रार मिळताच पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आणि घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. शनिवारी ग्रामस्थ आणि पोलिसांनी, या संपूर्ण डोंगर परिसरात सर्च ऑपरेशन राबवलं. बराच काल शोध सुरू होता. अखेर त्या डोंगराच्या पायथ्याशीच हे शिवलिंग सापडलं, त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

चोरीला गेलेल हे शिवलिंग सापडल्यामुळे परिसरातील तणाव काही प्रमाणात निवळला. मात्र असं असलं तरीही चोरीच्या या घटनेमागे नेमकं कोण आहे, याचा तपास सुरू आहे. अज्ञात चोरटा अद्याप फरार असून पोलीसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अतिशय दुर्गम भागातील या ऐतिहासिक मंदिरात घडलेल्या, चोरीच्या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता आरोपी चोराला अटक कधी होते, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...