AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या निधनानंतर 4 दिवसात सुनेत्रा पवार यांनी का घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ? देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा, थेट…

28 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला.

अजित पवार यांच्या निधनानंतर 4 दिवसात सुनेत्रा पवार यांनी का घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ? देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा, थेट...
Sunetra Pawar swearing ceremony as Deputy Chief Minister
| Updated on: Feb 28, 2026 | 12:21 PM
Share

मुंबईहून बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत वाचू शकली नाही. VSR कंपनीच्या विमानाने अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. हैराण करणारे म्हणजे विमानतळाच्या शेजारी असलेल्या शेतात हे विमान कोसळले. अजित पवार यांचा विमान अपघात 28 जानेवारी 2026 रोजी झाला. त्यानंतर लगेचच चार दिवसांनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुलगा जय पवार यांना घेऊन त्या मुंबईला पोहोचल्या आणि मुंबईत त्यांनी शासकीय बंगल्यावर पक्षातील नेत्यांची बैठक घेतली आणि काही वेळातच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल बोलताना स्पष्ट शब्दात शरद पवार यांनी म्हटले की, मला सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल कोणतीही कल्पना नाही.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथविधीसाठी घाई केल्याचे सातत्याने सांगितले जात होते. यावरून विरोधकांनी टीकाही केली. भाजपावर थेट पणे टीका करण्यात आली. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल अत्यंत मोठे विधान केले. शपथ घेण्याचा निर्णय नक्की कोणाचा होता, यावर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ कधी घ्यावी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय होता, त्यांनीच तारीख ठरवली. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीच्या तारखेच्या निर्णयात आमच्या पक्षाचा सहभाग नव्हता. त्यांच्यात पक्षाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या पक्षाची नेते माझ्याकडे कागदपत्रे घेऊन आले आणि त्यांनीच तारीख ठरवली. राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेत्यांनी केलेली मागणी आम्ही मान्य केली.

सुनेत्रा पवार यांनी लवकर शपथ घ्यावी, याकरिता भाजपाचा दबाव होता, असे आरोप सातत्याने केले जात होते. त्यावर आता पहिल्यांदाच बोलताना देवेंद्र फडणवीस दिसले. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, नक्की काय घडले ते. सुनेत्रा पवार यांनी फक्त उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीच नाही तर संपूर्ण पक्षाची धुरा आपल्या हातात ठेवलीये.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...