AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्जाधीश जेफ बेजोस 60 व्या वर्षी बोहल्यावर चढणार,लग्नावर होणार तब्बल इतका खर्च, कोण आहे त्यांची होणारी पत्नी ?

या भव्य लग्न सोहळ्याला अनेक हाय प्रोफाईल मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बातमीनुसार या लग्न सोहळ्याला बिल गेट्स, अभिनेता लिओनार्डो डिकाप्रियो आणि जॉर्डनची राणी रानिया उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

अब्जाधीश जेफ बेजोस 60 व्या वर्षी बोहल्यावर चढणार,लग्नावर होणार तब्बल इतका खर्च, कोण आहे त्यांची होणारी पत्नी ?
Jeff Bezos
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 7:44 PM

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले अ‍ॅमॅझॉन ( Amazon) कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहेत. साठाव्या वर्षी जेफ बेजोस त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ हीच्या सोबत ते लग्न करणार आहेत. हे लग्न कोलोराडोच्या एस्पेश शहरात होणार आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा शाही विवाह समारंभ ठरणार आहे. या लग्नसोहळ्यावर जवळपास सहाशे अब्ज डॉलर म्हणजे ५०९६ कोटी रुपये खर्च होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

केव्हा आहे लग्न सोहळा ?

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार जेफ बेजोस आणि लॉरेन सांचेज यांचा लग्न सोहळा पुढच्या शनिवारी आयोजित केला जाणार आहे. परंतू अजूनपर्यंत लग्नाच्या तारखेसंदर्भात अधिकृतरित्या बेजोस किंवा सांचेज यांच्यापैकी कोणीही अधिकृतरित्या सांगितलेले नाही.

लग्नात कोण-कोण असणार वऱ्हाडी ?

या भव्य लग्न सोहळ्यास अनेक नामीगिरामी हस्ती सामील होण्याची शक्यता आहे. बातम्यानुसार या लग्न सोहळ्यासाठी बिल गेट्स, लियोनार्डो डिकाप्रियो, जॉर्डनची राणी रानिया यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती हजर राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

लग्न समारंभाची तयारी सुरु

पार्टी आयोजित करणाऱ्यांना या ग्रँड इव्हेटची तयारीसाठी गु्प्त करार करावा लागला आहे. त्यामुळे लग्नासंबंधी कोणतीही माहिती सार्वजनिक होऊ नये याची काळजी घेतलेली आहे. एस्पेन शहरात आयोजित या लग्नसोहळ्यास खास बनविण्यासाठी संपूर्ण जगातून निवडणक वस्तू मागविल्या जाणार आहेत. एका एस्पेन वेडिंग प्लानरने सांगितले की दाम्पत्याच्या आवडीचा केक पॅरिसहून मागविण्यात येणार आहे. हेअर स्टाटलिस्टला न्यूयॉर्क येथून आवतण थाडले जाणार आहे. तसेच त्यांच्या आवडीचा बँड लग्न सोहळ्यात परफॉर्म करणार आहे.

लॉरेन सांचेझ कोण आहेत ?

लॉरेन सांचेझ या एक प्रसिद्ध पत्रकार, टीव्ही होस्ट आणि हॅलिकॉप्टर पायलट आहेत. त्या २०२३ पासून जेफ बेजोस यांच्यासोबत नात्यात आहेत. या लग्नाला विण्टर लँड थिमवर सजवले जाणार आहे. त्यामुळे हे लग्न या सिझनचे सर्वात न विसरता येण्याजोगे ठरणार आहे. हे लग्न न केवळ जेफ बेजोस यांची जीवनशैली दाखवेल तर त्यांची प्राधान्यक्रम देखील दाखविणार आहे.हा लग्न सोहळा एक नवीन किर्तीमान स्थापन करु शकतो असे म्हटले जात आहे.

लॉरेन सांचेझ उत्साही आहेत

लॉरेन सांचेझ या त्यांच्या विवाहानिमित्त एक्सायटेट आहेत. ‘द टुडे शो’ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की पुस्तकाच्या प्रसिद्धी आणि अन्य कामांसाठी त्यांच्याजवळ कमी वेळ वाचला आहे. तरीही लग्नाच्या तयारीसाठी त्यांनी पिंटरेस्ट सारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर ड्रेसच्या आयडीया शोधण्याची कबूली दिलेली आहे. सांचेझ यांनी सांगितले की, ‘मी देखील इतर वधूसारखे ‘पिंटरेस्ट’चा वापर करत असते.’

पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ स्थानिक रस्त्यावर अन् भारतीयांना आर्त हाक.
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला
पर्यटकांच्या तान्ह्या बाळाला वाचवण्यासाठी काश्मिरी चिमुकला सरसावला.
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.