BMC Election 2026: 15 जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान, शेअर बाजार बंद असणार? ती अपडेट काय?

Share Market Holiday: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होत आहे. NSE वर शेअर बाजाराचे व्यापारी सत्र सुरू असेल, पण BSE वर शेअर बाजार सुरू राहणार का? याविषयी गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार आहे का?

BMC Election 2026: 15 जानेवारी रोजी महापालिकांसाठी मतदान, शेअर बाजार बंद असणार? ती अपडेट काय?
शेअर बाजाराला सुट्टी?
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 10:54 AM

Stock Market closed: या 15 जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2026) मतदान होणार आहे. यामुळे यादिवशी शेअर बाजार सुरु राहणार की नाही याविषयी गुंतवणूकदारांच्या मनात संभ्रम आहे. महापालिका निवडणूक मतदानामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पण राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजवर (NSE) व्यापारी सत्र होणार आहे. त्यामुळे शेअर बाजाराला सुट्टी नसेल.BSE वर 15 जानेवारी 2026 व्यापारी सत्र होईल. शेअर बाजार सुरू असेल.

सेटलमेंट हॉलिडेचा परिणाम होणार?

15 जानेवारी रोजी शेअर बाजारात ट्रेडिंग होईल. पण या दिवशी सेटलमेंट हॉलिडे आहे. यामुळे फंड आणि सिक्युरिटीज सेटलमेंटच्या टाईमलाईनवर त्याचा परिणाम दिसेल. NSE ने अधिकृत पत्रक काढून ही माहिती दिली आहे. त्यानुसार, 15 जानेवारी रोजी ट्रेडिंग हे तासानुसार होईल. तर या दिवशी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका असल्या तरी या दिवशी बाजार सुरु असेल आणि व्यापारी सत्र सुरू असेल. शेअरची खरेदी-विक्री करता येईल. तर सेटलमेंट हे तासानुसार होतील. कारण यादिवशी सेटलमेंट हॉलिडे आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांना या दिवशी ट्रेडिंग करता येईल. पण फंड आणि सिक्युरिटीज सेटलमेंट लागलीच होणार नाही. त्यासाठी उशीर होईल. गुंतवणूकदारांना त्यासाठी वाट पाहावी लागेल. तासानुसार हे सेटलमेंट प्रक्रिया होईल. तुम्ही ट्रेडिंग करु शकत असला तरी त्यासाठी वाट पाहावी लागेल. सेटलमेंट हॉलिडे असल्याने या दिवशी फंड क्रेडिट होणे आणि सिक्युरिटीजच्या डिलिव्हरीवर परिणाम दिसेल. 14 जानेवारी आणि 15 जानेवारी रोजी ट्रेडसाठी T+1 सेटलमेंट आता 16 जानेवारी रोजी होतील.

किमान 3 ते 5 मतांचा हक्क

मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत. मुंबई महापालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यायचा आहे. प्रत्येक मतदाराला या ठिकाणी एकच मत द्यावे लागणार आहे. तर राज्यातील उर्वरीत 28 महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. प्रत्येक प्रभागात साधारणपणे 4 उमेदवार, जागा आहेत. काही ठिकाणी ही संख्या कमी म्हणजे 3 तर काही ठिकाणी हा आकडा 5 इतका आहे. त्यामुळे या महापालिकांमध्ये मतदारांना किमान 3 ते 5 मतं द्यावी लागतील.