AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साहेबांच्या देशातील प्रसिद्ध बिअर भारतात दाखल, किती आहे किंमत ?

लायन ब्रुअरी कंपनीने भारतात कॉपरड्रॉप स्पिरिट्ससोबत भागीदारी केली आहे. ही कंपनी भारतात लायन ब्रुअरी कंपनीची एक्सक्लुसिव्ही इम्पोर्टर आणि डिस्ट्रीब्युटर असणार आहे

साहेबांच्या देशातील प्रसिद्ध बिअर भारतात दाखल, किती आहे किंमत ?
British Beer Company
| Updated on: Aug 03, 2026 | 6:23 PM
Share

British Beer Company: जर तुम्ही नवीन आणि प्रीमियम बिअर ट्राय करणे पसंद करत असाल तर ब्रिटनची प्रसिद्ध लायन ब्रुअरी कंपनीने सुमारे ६० वर्षानंतर आथा भारतात पुन्हा एण्ट्री केली आहे. कंपनीने सध्या राजधानी दिल्ली पासून आपली सुरुवात केली आहे आणि येत्या काळात हरियाणा आणि उत्तर प्रदेशात आपला बिझनस वाढवण्याची तयारी केली आहे.

लायन ब्रुअरी कंपनीची स्थापना साल १८३६ साली लंडन येथे झाले होती. भारतात कंपनीने कॉपरड्रॉप स्पिरिट्ससोबत भागीदारी केली आहे. कॉपरड्रॉप स्पिरिट्स कंपनी भारतात लायन ब्रुअरी कंपनीची एक्सक्लुसिव्ही इम्पोर्टर आणि डिस्ट्रीब्युटर असणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की भारत त्यांच्यासाठी न केवळ नवा बाजार आहे. त्याच्या पेक्षा जास्त त्याच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आहे.

दोन प्रीमियम बिअर लाँच, किंमत 230 रुपये

लायन ब्रुअरी कंपनीने दिल्लीत आपल्या दोन प्रीमीयम बिअरचे लाँचिंग केले आहे. यात आईसलँड लागर आणि पेल एलचा समावेश आहे. दोन्ही बिअरच्या बॉटल 330ml च्या असून त्यांची किरकोळ विक्री किंमत २३० रुपये फिक्स ठेवण्यात आली आहे. सध्या हे दोन्ही प्रोडक्ट्स दिल्लीत मिळत आहेत. आणि लवकरच अन्य शहरात देखील हे मिळू लागतील असे म्हटले जात आहे.

लायन ब्रुअरीचा भारतातील वापसीचा एक जुना ट्रॅक रेकॉर्ड देखील आहे. ब्रिटीशकाळात भारतासाठी तयार केलेल्या प्रसिद्ध इंडिया पेल एले बिअरला सुरुवातीला बनवणारे आणि पाठवण्यात या कंपनीचा सहभाग होता. याच कारणाने कंपनी यास पावलाला भारतात आपली वापसी मानत आहे.

प्रीमियम बिअरच्या जादा मागणीवर नजर

कंपनीच्या मते भारतात प्रीमियम आणि क्राफ्ट बिअरची मागणी वेगाने वाढत आहे. जास्त पैसे आणि बदलत्या जीवनशैलीत नव्या चवीला पसंद करणारे कस्टमरच्या कारणाने या सेगमेंटमध्ये सातत्याने वाढ पाहायला मिळत आहे. कंपनीच्या मते भारताचा प्रीमियम बिअर बाजार दरवर्षी ४० टक्क्यांच्या वेगाने वाढत आहे. तर संपूर्ण बिअर बाजारात २०२८ पर्यंत ८ ते १० टक्के वार्षिक वाढीचा अंदाज आहे.

लायन ब्रूअरीचे मॅनेजिंग डायरेक्टर विल जूलियस म्हणाले की इतक्या काळानंतर भारतात परतणे कंपनीसाठी खास आहे. तसेच कॉपरड्रॉप स्पिरिट्सच्या मते भारतात प्रीमियम इंटरनॅशनल बिअर ब्रँड्सचा चांगली संधी आहे. आणि लायन ब्रुअरीच्या भारतीय ग्राहकांना चांगला ब्रँड आणि चांगली क्वालिटी पसंद येऊ शकते.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं