AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेल महागणार तर मग महागाई येणार? वाचा सरकारनं काय केलंय?

अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर येत्या काही दिवसात खाण्याच्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. (Crude Palm Oil import duty)

पेट्रोल-डिझेल महागणार तर मग महागाई येणार? वाचा सरकारनं काय केलंय?
| Updated on: Feb 01, 2021 | 4:55 PM
Share

Budget 2021 | नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील तिसरा अर्थसंकल्प आज सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर येत्या काही दिवसात खाण्याच्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. (Budget 2021 Crude Palm Oil import duty)

निर्मला सीतारमण यांनी कच्च्या पाम तेलावर 17.5 टक्के कृषी अधिभार (Cess tax) लावण्यात आला आहे. यासोबतच सोयाबीनचे कच्चे तेल आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावर 20 टक्के कृषी अधिभार (Cess tax) लावला आहे. येत्या 2 ऑक्टोबर 2021 पासून हा कृषी अधिभार लावण्यात आला आहे. यासोबतच मद्य आणि संबंधित उत्पादनांवर 100 टक्के कृषी सेस लागू केला आहे.

केंद्र सरकारने यंदाच्या बजेटमध्ये कृषी क्षेत्रासाठी 16.5 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. याची जमवाजमव करण्यासाठी सरकारकडून कृषी सेस लागू करण्यात आला आहे. Edible Oil सोबतच काबुली चण्यांवर 30 टक्के, मटरवर 10 टक्के, बंगाली चण्यांवर 50 टक्के, मसूरवर 20 टक्के आणि कापसावर 5 टक्के कृषी सेस लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

यासोबतच सोने आणि चांदीवर 2.5 टक्के, मद्य आणि संबंधित उत्पादनांवर 100 टक्के, सफरचंदवर 35 टक्के कृषी सेस लावण्यात आला आहे. तसेच पेट्रोलवर प्रति लीटर 2.5 रुपये आणि डिझेलवर 4 रुपयांचा कृषी अधिभार लावण्याची घोषणा करण्यात आली.

आयात शुल्कात 12.5 टक्क्यांनी घट

दरम्यान कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क 27.5 टक्क्यांवरुन 15 टक्के करण्यात आला आहे. यासोबतच सोयाबीन तेल आणि सूर्यफुलाच्या तेलावरील आयात शुल्क हा 35 टक्क्यांवरुन 15 टक्के करण्यात आला आहे. याआधी कच्च्या पाम तेलाची आयात किंमत 36 डॉलरहून कमी करण्यात आला आहे. आता ही किंमत कमी करुन 1013 डॉलर प्रतिटन करण्यात आला आहे. ही माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

देशात पाम तेलाची सर्वाधिक आयात

भारतात सर्वाधिक पाम तेलाची  आयात होते. दरवर्षी 9 मिलीयन टन पाम तेल भारतात आयात केले जाते. भारतात इंडोनेशिया आणि मलेशिया या ठिकाणाहून जास्तीत जास्त तेल आयात होते. भारतातील पाम तेलाच्या एकूण आयातीत 70 टक्के पाम तेल इंडोनेशियातून येते आहे. तर 30 टक्के तेल हे मलेशियातून खरेदी केले जाते.  (Budget 2021 Crude Palm Oil import duty)

संबंधित बातम्या : 

Share market Budget 2021: सेन्सेक्समध्ये 2000 पॉईंटसची उसळी; मार्केट कॅप 6 लाख कोटींनी वाढली

Budget 2021 : पहिल्यांदाच नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही, वाचा सविस्तर…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.