Budget 2021 : पहिल्यांदाच नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही, वाचा सविस्तर…

आर्थिक वर्ष 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालाय. मात्र पहिल्यांदाच देशाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी करात कोणतीही घोषणा झालेली नाही.

Budget 2021 : पहिल्यांदाच नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 4:11 PM

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झालाय. मात्र पहिल्यांदाच देशाच्या अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी करात कोणतीही घोषणा झालेली नाही. याशिवाय प्रत्यक्ष करात कोणताही बदल न केलेला मागील 10 वर्षातील हा पहिला अर्थसंकल्प ठरलाय. मागील वर्षी मात्र अर्थसंकल्पात नव्या कररचनेची घोषणा करण्यात आली होती. यानुसार 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नाला करातून सवलत देण्यात आली होती. यापुढे 2.5 ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आणि 5 ते 7.5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारणीची घोषणा करण्यात आली होती (Budget 2021 for the first time no big announcement for employees about tax concession)

75 वर्षांपेक्षा अधिक करदात्यांना सवलत

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करदात्यांसाठी आणखी एक दिलासा दिलाय. त्या म्हणाल्या, “75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या करदात्यांना यापुढे इनकम रिटर्न भरणं गरजेचं असणार नाही. असं असलं तरी या सवलतीचा लाभ तेच नागरिक घेऊ शकतात ज्यांचा उत्पन्नाचा मार्ग केवळ पेन्शन आहे. त्यांचा कर त्यांच्या उत्पन्नातूनच कपात केला जाईल.”

अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या, “अनिवासी भारतीयांना (NRI) दुहेरी करआकारणीतून सुटका देण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचनाही काढण्यात येईल. टॅक्स ऑडिटची मर्यादा 5 कोटी रुपयांवरुन 10 कोटी रुपये वाढवण्यात आलेत.”

अर्थसंकल्पादिवशीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, LPG गॅस सिलिंडर महागला

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्य लोकांना मोठा झटका मिळाला आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच इंडियन ऑईल आणि LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. IOCL प्रत्येक महिन्याला LPG गॅस सिलिंडरच्या किमतीची समिक्षा करते आणि नव्या दरांची घोषणा करत असते. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यासाठी गॅसच्या किमती जाहीर केल्या आहेत. कमर्शियल LGP गॅस सिलिंडरची किंमत 190 रुपये प्रति सिलिंडरने वाढवण्यात आली आहे. तर घरगुती गॅसच्या किमतीत कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. हे नवे दर आज 1 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Union Budget 2021 Marathi LIVE : आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन:पंतप्रधान नरेंद्र मोदी

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Budget 2021-22 : तुमच्याकडेही 20 वर्षांपेक्षा जुनी गाडी आहे? Scrappage Police चा परिणाम काय?

पेट्रोल 1 हजार रुपये लिटर करुन लोकांना मारायचं आहे, संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

Budget 2021 for the first time no big announcement for employees about tax concession

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.