AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhavook Tripathi : एका कंपनीने नशीब उघडलं की राव! या शेअरने भावुक त्रिपाठी मालामाल

Bhavook Tripathi : 6 मार्च 2009 रोजी आर सिस्टम्स इंटरनॅशनलचा शेअर 4.65 रुपयांवर होता. आज या शेअरमुळे अनेक गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्यात भावुक त्रिपाठी यांनी तर इतक्या हजार कोटींची कमाई केली. त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य इतक्या हजार कोटींच्या घरात पोहचले.

Bhavook Tripathi : एका कंपनीने नशीब उघडलं की राव! या शेअरने भावुक त्रिपाठी मालामाल
| Updated on: Aug 20, 2023 | 3:42 PM
Share

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : कंपन्यांना डिजिटल ट्रान्सफॉरमेशनची सुविधा देण्याचे काम आर सिस्टम (R System International) ही कंपनी देते. दिग्गज गुंतवणूकदार भावुक त्रिपाठी यांच्यासाठी तर या कंपनीने श्रीमंती आणली आहे. या कंपनीच्या शेअरने भावुक त्रिपाठी (Bhavook Tripathi) यांना 1934 कोटींची लॉटरी लागली आहे. आर सिस्टम इंटरनॅशनलमध्ये भावुक त्रिपाठी यांची 32.1 टक्के हिस्सेदारी आहे. आर सिस्टम इंटरनॅशनलचे शेअर 4.65 रुपयांना होता. आतापर्यंत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 110 पट वाढली आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 टक्क्यांची तेजी नोंदवली. हा शेअर 508 रुपयांवर पोहचला. गेल्या 5 दिवसांत आर इंटरनॅशनलने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला. हा शेअर 467 रुपयांहून 508 रुपयांवर पोहचला. या शेअरने 9 टक्क्यांचा बंपर रिटर्न दिला.

इतके आहे भांडवल

आर सिस्टम इंटरनॅशनलचे मार्केट कॅप जवळपास 6020 कोटी रुपये आहे. या कंपनीचा 52 आठवड्याचा उच्चांक 517 रुपये आणि 52 आठवड्यातील निच्चांक 218 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात आर सिस्टम इंटरनॅशनलचा शेअरमध्ये गुंतवणूकदारांना 13 टक्के तर गेल्या 6 महिन्यात 100 टक्के परतावा दिला. गुंतवणूकदार मालामाल झाला.

असा मिळाला परतावा

यावर्षी 22 मे रोजी हा शेअर 244 या निच्चांकी स्तरावर होता. या शेअरने आतापर्यंत 110 टक्के परतावा दिला. दीर्घकालीन गुंतवणुकीवर तर या शेअरने मोठा परतावा दिला. 26 मे 2006 रोजीपासून या शेअरने मोठा परतावा दिला. आतापर्यंत या शेअरने गुंतवणूकदारांना 2282 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा दिला.

या शेअरने पण केले मालामाल

Tanla Platforms असे या शेअरचे नाव आहे. या कंपनीने मोठा पल्ला गाठला आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या 10 वर्षांत धमाकेदार रिटर्न दिले आहे. या शेअरचा भाव 3 रुपयांपेक्षा पण कमी कमी आहे. आता या कंपनीच्या शेअरने 1100 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. इतकी मोठी झेप घेतल्याने सुरुवातीला गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता कोट्याधीश झाले आहेत.

शेअर एकदम तेजीत

2 ऑगस्ट 2013 रोजी एनएसईवर Tanla Platforms वर हा शेअर 2.75 रुपये होता. आता या शेअरची किंमत 1000 रुपये आहे. केवळ 10 वर्षांत या शेअरने मोठा पल्ला गाठला आहे. गुंतवणूकदारांना मोठी कमाई करुन दिली आहे. वर्ष 2020 मध्ये हा शेअर 100 रुपयांवर होता. त्यानंतर हा शेअर सूसाट झाला. त्याने त्याच वर्षी 600 रुपयांचा टप्पा गाठला. 18 ऑगस्ट 2023 रोजी या शेअरने एनएसईवर 1101 रुपयांचा टप्पा गाठला.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.