Gold Silver Rate Today : सोनेरी खेळात, खरेदीदारांची ‘चांदी’! सराफा बाजारात झुंबड

Gold Silver Rate Today : सोनेरी खेळात सध्या खरेदीदारांनी चांदी होत आहे. जोपर्यंत डॉलरचे दडपण आहे तोपर्यंत रुपया आणि सोने-चांदीचे भाव वधारणार नाहीत.

Gold Silver Rate Today : सोनेरी खेळात, खरेदीदारांची 'चांदी'! सराफा बाजारात झुंबड
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 9:07 AM

नवी दिल्ली : सोनेरी खेळात सध्या खरेदीदारांनी चांदी होत आहे. जोपर्यंत डॉलरचे दडपण आहे तोपर्यंत रुपया आणि सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price) वधारणार नाहीत. पुढील आठवड्यापर्यंत तरी अमेरिकेतील कर्ज फेड प्रकरणावर तोडगा निघण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळे सोने-चांदीचे भाव घसरणीवर असतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अमेरिकेतील दिवाळीखोरी थांबली नाही तर मात्र सोने-चांदी काय प्रतिक्रिया देतील हे आताच सांगणे कठीण आहे. पण सध्या खरेदीदारांना सोने-खरेदीची संधी आहे. गेल्या पंधरवाड्यात दोन दिवस वगळता सोने-चांदीत पडझड सुरु आहे. खरेदीदार, गुंतवणूकदारांना त्याचा फायदा घेता येईल.

US debt crisis अमेरिका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कर्ज घेण्यासाठीची मर्यादा आतापर्यंत 78 वेळा वाढविण्यात आली आहे. आता पुन्हा त्यात वाढ होईल का, हा खरा प्रश्न आहे. युएस फेडरल रिझर्व्ह बँकेने पुन्हा व्याजदर वाढीचा इशारा दिला आहे. परिणामी डॉलर वधारला आहे. रुपया दोन आठवड्यांपासून कमकुवत आहे. तर सोने-चांदीच्या भाव दबावाखाली आहे. वायदे बाजारात पण सोने 58,500 रुपयांपर्यंत घसरले आहे.

दोनच दिवस सोन्याचे गेल्या पंधरवाड्यापासून मौल्यवान धातूमध्ये घसरणीचे सत्र सुरु आहे. चांदीतील घसरण कायम आहे. 24 मे आणि 20 मे हे दोन दिवस वगळता सोने-चांदीत पडझड सुरु आहे. अनुक्रमे प्रति 10 ग्रॅम 250-260 रुपयांची आणि 500-550 रुपयांची दरवाढ या दिवशी नोंदविण्यात आली. पण या दहा दिवसांत सोन्यात जवळपास 1800 रुपये प्रति 10 ग्रॅम पडझड झाली.

हे सुद्धा वाचा

सोने-चांदीचा भाव काय goodreturns च्या आकडेवारीनुसार, 27 मे रोजी, सोन्यात 100-150 रुपयांची घसरण झाली. शनिवारी 22 कॅरेटचा भाव 55,650 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. IBJA नुसार, शनिवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,142 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,090 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर एक किलो चांदीचा भाव 70,500 रुपये आहे.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,142 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 59,901रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,090 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,107 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.